माझं लेकरू सुखरूप घरी पोहोचवा, संसद परिसरात धुडगूस घालणाऱ्या अमोल शिंदेच्या आईची मागणी

Amol Shinde Mother : राजधानी दिल्लीतील संसद परिसरात रंगीत धूराचे फटाके पेटवून घोषणाबाजी करणारा तरूण हा महाराष्ट्रातील असल्याचं समोर आलं आहे. अमोल धनराज शिंदे (Amol Shinde) असं या तरुणाचं नाव असून हा लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील झरी इसगाव येथील रहिवासी आहे. पदवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या या तरुणाने घरात पोलीस भरतीला जात असल्याचं सांगितलं होतं. पण आज त्याला थेट संसदेबाहेर केलेल्या कृत्याबाबत अटक करण्यात आली.

दरम्यान, अमोल शिंदे याच्या सुटकेसाठी त्याच्या आईने टाहो फोडला आहे. माझं लेकरू सुखरूप घरी पोहोचवा, अशी मागणी अमोल शिंदेच्या आईने केली आहे. अमोलच्या आईला अश्रू अनावर झाले.

‘माझं काम आहे जातो म्हणाला. भरतीची त्याला आवड होती, झाली नाही त्यामुळे नाराज झाला होता. मग पोलीस भरती तरी बघतो, काही तरी करतो म्हणून गेला. गुन्हा कशाने केला, नोकरीच्या त्यागाने केला, कशाने केला, सगळी कागदपत्र पोलीस घेऊन गेले. सरकारने आम्हाला आमचं लेकरू माझ्यापर्यंत पोहोचवावं’, अशी भावना अमोलच्या आईने व्यक्त केली.

महत्वाच्या बातम्या-