Budget 2023 : जगाने भारताची ताकद ओळखली आहे, भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे -सीतारमण

Budget 2023 India Live Updates : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज 2023-2024 या वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्प (union budget 2023) सादर केला आहे. निर्मला सीतारामन यांचा अर्थमंत्री म्हणून हा पाचवा अर्थसंकल्प होता. पुढील वर्षी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकारचा हा शेवटचा पूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प होता.

त्या म्हणाल्या की, अमृतकाळातील हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. निर्मला सीतारमण म्हणाल्या की, जगाने भारताची ताकद ओळखली आहे. भारतीय अर्थव्यवस्था योग्य दिशेने वाटचाल करत आहे आणि उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करत आहे. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, कोरोनाच्या काळात कोणीही उपाशी झोपणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. सरकारने 2 लाख कोटी रुपये खर्च करून प्रत्येक व्यक्तीला अन्नधान्य दिले. 80 कोटी लोकांना 28 महिन्यांसाठी मोफत रेशनची व्यवस्था करण्यात आली.