Interim budget 2024 | “आजच्या बजेटमध्ये विकसित भारताची गॅरंटी”; PM मोदींनी निर्मला सितारामन यांचं केलं कौतुक

What did Prime Minister Narendra Modi say on Union Budget: केंद्रीय अंतरिम अर्थसंकल्प 2024-25 ( (Interim budget 2024) वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनी या अर्थसंकल्पाचे कौतुक केले आणि सामान्यांसाठी फायदेशीर असल्याचे वर्णन केले. या अर्थसंकल्पासाठी पंतप्रधानांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांचेही अभिनंदन केले. अर्थसंकल्पातील प्रत्येक घोषणेचा संदर्भ देत, लोकांना त्याचा कसा फायदा होईल हे सांगितले. आपल्या सरकारने लक्ष्य निश्चित केले आहे आणि ते साध्य केले आहे याचाही त्यांनी उल्लेख केला.

अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या चारही स्तंभांना सक्षम करेल – तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी. निर्मलाजींचा हा अर्थसंकल्प देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प आहे. हा अर्थसंकल्प 2047 च्या विकसित भारताचा पाया मजबूत करण्याची हमी देणारा आहे. मी निर्मलाजी आणि त्यांच्या टीमचे खूप खूप अभिनंदन करतो. हा अर्थसंकल्प तरुण भारताच्या युवा आकांक्षांचे प्रतिबिंब आहे.

अर्थसंकल्पात दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले. संशोधन आणि नवोपक्रमासाठी 1 लाख कोटी रुपयांचा निधी तयार करण्याची घोषणा करण्यात आली. स्टार्टअप्सना कर सवलत वाढवण्याची घोषणाही अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात वित्तीय तूट नियंत्रणात ठेवताना भांडवली खर्चाला 11 लाख 11 हजार 111 कोटी रुपयांचा ऐतिहासिक उच्चांक देण्यात आला आहे. यामुळे भारतामध्ये 21 व्या शतकातील आधुनिक पायाभूत सुविधांच्या निर्मितीसह तरुणांसाठी रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण होतील.

आणखी 2 कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य – पंतप्रधान

पंतप्रधान म्हणाले की, अर्थसंकल्पात (Interim budget 2024) वंदे भारत सारख्या 40 हजार आधुनिक बोगी बनवण्याची आणि सामान्य प्रवासी गाड्यांमध्ये बसवण्याची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे करोडो प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळेल. आपण एक मोठे ध्येय ठेवतो आणि ते साध्य करतो आणि स्वतःसाठी आणखी मोठे ध्येय ठेवतो. आम्ही खेडे आणि शहरांमध्ये गरिबांसाठी 4 कोटींहून अधिक घरे बांधली. आता आम्ही आणखी 2 कोटी नवीन घरे बांधण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

आयुष्मान भारत योजनेचा उल्लेख केला

पंतप्रधान म्हणाले की, आम्ही 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य ठेवले होते, आता हे लक्ष्य 3 कोटी करण्यात आले आहे. आयुष्मान भारत योजनेमुळे गरिबांना खूप मदत झाली. आता या योजनेचा लाभ अंगणवाडी आणि आशा सेविकांना मिळणार आहे. या अर्थसंकल्पात गरीब आणि मध्यमवर्गीयांच्या सक्षमीकरणावर आणि त्यांच्यासाठी उत्पन्नाच्या नवीन संधी निर्माण करण्यावरही भरपूर भर देण्यात आला आहे. रुफटॉप सोलर मोहिमेअंतर्गत एक कोटी कुटुंबांना सोलर रूफटॉपद्वारे मोफत वीज मिळणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी