‘सरकारचे आर्थिक व्यवस्थापन इतके उच्च पातळीचे आहे की त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवी आशा मिळाली’

Budget 2024 Live Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत.

आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, जन धन खात्यांमध्ये पैसे जमा करून 2.7 लाख कोटी रुपये वाचले आहेत आणि सरकारचे आर्थिक व्यवस्थापन इतके उच्च पातळीचे आहे की त्यामुळे देशाला नवी दिशा आणि नवी आशा मिळाली आहे.देशातील सर्व राज्ये आणि घटकांना एकत्रितपणे देशाच्या आर्थिक प्रगतीचा लाभ मिळावा यासाठी मोदी सरकारने व्यवस्था केली आहे.

आर्थिक क्षेत्र अधिक मजबूत आणि अधिक सुलभपणे कार्य करण्यास सक्षम केले जात आहे. देशातील महागाईबाबतच्या कठीण आव्हानांवर मात करण्यात येत असून महागाईचे आकडे खाली आले आहेत. जीडीपीच्या विकासावर सरकारचे लक्ष असून त्यासाठी सरकारच्या प्रयत्नांना फळ मिळत असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. जागतिक तणावामुळे आव्हाने वाढत आहेत परंतु या संकटातही भारताने चांगली जीडीपी वाढ साधली आहे. GST अंतर्गत वन नेशन वन मार्केट साध्य झाले असून भारत आणि मध्य पूर्व युरोप दरम्यान कॉरिडॉर बांधण्याची घोषणा गेम चेंजर ठरेल. असे त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी