झारखंडमध्ये राजकीय भूकंप; राज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Hemant Soren | सैन्यदलाची जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणी पैशांचा गैरव्यवहार केल्याचा आरोप असलेल्या झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) यांना सक्तवसुली संचालनालयानं अटक केली आहे. हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सीपी राधाकृष्णन (CP Radhakrishnan) यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

हेमंत सोरेन यांना आज ईडीच्या वतीनं न्यायालयात हजर करण्यात येणार असून सोरेन यांनी दाखल केलेल्या याचिकेवरही झारखंड उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल याची युती असलेल्या गटानं झारखंडचे (Jharkhand) मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून चंपई सोरेन (Champai Soren) यांच्या नावाचा प्रस्ताव आणि त्यासंदर्भातील पत्र राज्यपालांना दिलं आणि त्यांनी ते स्विकारलं आहे. मात्र अद्याप सत्ताधारी पक्षाला मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी राज्यपालांनी आमंत्रित केलेलं नाही. या युतीतील समर्थक 47 आमदारांनी चंपाई सोरेन यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

राष्ट्रवादीची जोरदार मोर्चेबांधणी; मेळाव्यांचा लावला धडाका

महाराष्ट्रातील ११ गड किल्ल्यांचा युनेस्कोकडे नामांकनासाठी प्रस्ताव, मुख्यमंत्री शिंदेंची माहिती

‘प्रिंट मिडिया प्रमाणे डिजिटल मिडियाला राजमान्यता देऊन पत्रकारांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार’