प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आणखी दोन कोटी घरे बांधली जाणार- अर्थमंत्री निर्मला सीतारामन

Budget 2024 Live Updates, Finance Minister Nirmala Sitharaman Speech: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत.

यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या, देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने चालली आहे. आमच्या सरकारचे लक्ष पारदर्शक कारभारावर आहे. अर्थमंत्र्यांनी 20 मिनिटे केंद्र सरकारच्या योजनांची गणना केली आणि भारताच्या विकासाच्या गतीवर चर्चा केली. पुढे त्या म्हणाल्या की, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पुढील 5 वर्षांत ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरे बांधली जातील.

25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढले

तसेच अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे आणि पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे रोख रक्कम थेट करोडो शेतकऱ्यांना हस्तांतरित केली जात आहे. देशातील अन्नदाता या योजनेचा लाभ घेत असून 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम फसल योजनेचा लाभ दिला जात आहे. आम्ही 300 विद्यापीठे स्थापन केली आहेत आणि एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले आहे.

25 कोटी लोकांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यात मोदी सरकारला यश आल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. सरकार सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत आहे आणि गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्या सक्षमीकरणावर भर देत आहे. पीएम स्वानिधी योजनेअंतर्गत ४ कोटी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला असून 78 लाख विक्रेत्यांना मदत करण्यात आली आहे. 34 लाख कोटी रुपये थेट जनधनद्वारे हस्तांतरित करण्यात आले आहेत.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी