Budget 2024 Live Updates | 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस दिली जाणार

Budget 2024 Live Updates : देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प (Budget 2024 Live Updates) सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक यशांची गणना केली आहे.

आपल्या भाषणात त्या म्हणाल्या, देशात महिलांसाठी अनेक योजना राबविण्यात येत असून त्यामुळे त्यांचा आर्थिक आणि सामाजिक विकास होत आहे. लखपती दीदी योजनेंतर्गत देशात १ कोटी लखपती दिदी बनल्या आहेत. त्याचे उद्दिष्ट 2 कोटींवरून 3 कोटी करण्यात आले असून 3 कोटी लखपती दिदी तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस दिली जाईल जेणेकरून हा कर्करोग रोखता येईल.

घरांवरील सोलर पॅनल्सच्या मदतीने येत्या काळीत १ कोटी घरांना महिन्याला ३०० युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) अयोध्येतील राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्यावेळी सोडलेला ऐतिहासिक संकल्प पूर्ण करण्याच्या दिशेने कार्यवाही केली जाईल असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी