“..केंद्र सरकार त्यांच्या खर्चासाठी उधार पैसे घेत आहे”, अर्थसंकल्पावर काँग्रेसनं व्यक्त केली चिंता

Manish Tiwari On Budget 2024: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पात अर्थमंत्री सीतारमण यांनी ४७.६६ लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज वर्तवला. तसेच जवळपास १८ लाख कोटींची तूट दाखवण्यात आली. आता यावर काँग्रेसची प्रतिक्रिया आली आहे.

अर्थसंकल्पावर चिंता व्यक्त करताना काँग्रेस खासदार मनिष तिवारी (Manish Tiwari) म्हणाले की, “या अंतरिम अर्थसंकल्पाचा एकच हेतू आहे तो म्हणजे या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सरकारच्या खर्चांना मंजुरी घेणे. पण त्यातली चिंता वाढवणारी बाब म्हणजे या अर्थसंकल्पात तब्बल १८ लाख कोटींची तूट दाखवण्यात आली आहे. याचा अर्थ केंद्र सरकार त्यांच्या खर्चासाठी उधार पैसे घेत आहे. पुढच्या वर्षी या खर्चात आणखी भरच पडणार आहे”, अशी प्रतिक्रिया मनिष तिवारी (Manish Tiwari) यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी