MK Stalin: मुलगा उदयनिधींच्या ‘सनातन’ विधानावर CM स्टॅलिन यांनी पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

Sanatana Dharma Controversy:  तमिळनाडूतील सत्तारुढ द्रमुक सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (Chief Minister M. K. Stalin) यांचा दिवटा पुत्र उदयनिधीने (Udayanidhi) सनातन धर्माविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. उदयनिधीने सनातन धर्माची तुलना मलेरिया आणि डेंग्यूशी केली होती. सनातन धर्म हा सामाजिक न्याय आणि समतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींना विरोध करता येत नाही, त्या रद्द केल्या पाहिजेत. आम्ही डेंग्यू, डास, मलेरिया किंवा कोरोनाला विरोध करू शकत नाही. आपण ते हटवावे लागेल. तसेच सनातनलाही नष्ट करायचे आहे.’ असे म्हटले होते.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन (MK Stalin) यांनी अखेर मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी केलेल्या सनानत धर्मावरील वादग्रस्त विधानावर अखेर मौन तोडलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावर टिप्पणी केल्यानंतर स्टॅलिन यांनी त्यांना हे शोभत नसल्याचं म्हटलं आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले, उदयनिधी यांनी सनातन धर्माविषयी केलेलं विधान हे चुकीच्या पद्धतीनं मांडलं जात आहे. उदयनिधींनी सनातनी विचारांच्या लोकांच्या नरसंहाराचं आवाहन, केल्याचं चुकीचं सांगितलं जात आहे. भाजपानं सोशल मीडियात नेमलेल्या झुंडी उत्तर भारतात उदयनिधींबाबत खोटं विधान पसरवत आहेत. उदयनिधी यांनी ‘नरसंहार’ हा शब्द तामिळमध्ये किंवा इंग्रजीतूनही आपल्या विधानात उच्चारलेला नाही. पण खोटं पसरवण्यात याचा दावा करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde