15 वर्षांच्या छोट्या सोलापुरी पत्रकाराचा नादखुळा

शेतकऱ्यांचा मित्र आणि मार्गदर्शक

सोलापूर :  सोशल मीडिया कोणालाही रातोरात सुपरस्टार बनवून शकतं. यूट्यूब हे असं माध्यम आहे ज्यातून अगदी छोट्या गावातील कलाकार देखील सुपरस्टार झाले आहेत. युट्यूब असो किंवा कोणतेही सोशल माध्यम त्यावर प्रसिद्ध होण्यासाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे सातत्य आणि दुसरी गोष्टी म्हणजे विषयांची निवड आणि हे जमलं की तुम्ही प्रसिद्ध होणार म्हणजे होणारच. सध्या सोलापुर जिल्ह्यात अशाच एका यूट्यूब स्टारची चर्चा आहे.

आपल्या अस्सल सोलापुरी भाषेत हा मुलगा शेतीचे अनेक विषय भन्नाट रीतीने मांडतो. एकदा विडियो प्ले केला की विषय संपला. तुम्ही तो विडियो शेवट पर्यत पाहता.मु. मांजरगाव ता.करमाळा जि.सोलापूर येथील महेशकुमार कुलकर्णी यांचा मुलगा चैतन्य सध्या त्यांच्या आपली शेती, आपलं शिवार या ट्यूब चॅनेलमुळे प्रसिद्ध होत आहे.

चैतन्यबद्दल त्यांचे वडील म्हणतात, माझा मुलगा चैतन्य हा सध्या तो अभिनव पब्लिक स्कूल वाशिंबे येथे दहावी मध्ये शिकत आहे. लॉकडाऊन च्या काळात ऑनलाईन शिक्षण घेत असताना त्याला युट्युब चॅनल काढण्याचे वेड लागले.सुरवातीला चैतन्य क्रियशन नावाचा पहीला चॅनल काढला त्यांच्यावर वेगवेगळे विषय घेऊन व्हीडीओ टाकत असताना घरगुती औषधे शेती मधील प्रयोग शाळेमध्ये शिकवले जाणारे व्याकरण गणिता वर चे व्हीडीओ टाकले परंतु तो चॅनल जास्त पहिला जात नव्हता, कारण त्याला बघणारा वर्ग कमी होता. म्हणुन आणखी एक चॅनल काढण्याचे ठरले. त्यानुसार विषय निवड ला शेती आपली शेती आपलं शिवार हा चॅनल तयार केला. शेतीमध्ये केली जाणारी वेगवेगळी पिके त्याच्यासाठी शेतकऱ्यानी केलेले कष्ठ त्याच बरोबर त्याला मिळालेले उत्पन्न खर्च बाजार भाव शेती बरोबर पुरक व्यवसाय याविषयी माहीती घेऊन त्यावर व्हीडीओ बनवले.

त्यानंतर फळ बागा असलेल्या शेतकर्यांच्या मुलाखती घेण्यास सुरूवात केली शेतकऱ्यानी शेती मध्ये केलेल वेगवेगळे प्रयोग दाखवले लोकांनी या चॅनल ला खुप पसंती दिली १००० च्या वर शेतकरी आम्हाला जोडले गेलेआहेत. ५०-६० हजार शेतकऱ्यांनी चॅनल वरचे व्हीडीओ पाहिले रोजचे रोज व्हीडीओ पाहणाऱ्यांची संख्या वाढु लागली आहे. विशेष म्हणजे चैतन्यने व्हीडीओ एडीटींग करणे आणि एकसपोजींग करणेचे कुठेही शिक्षण घेतले नाही परंतु सरावाने ते सहज होत गेले सध्या शाळेचे शिक्षण घेत घेत २ चॅनल सुरु आहेत रोज दर्शकांना नाविन्यपुर्ण माहिती व उपयोगाची माहीती देण्याचा प्रयत्न करत आहे .सध्या हे दोनही चॅनल मोनोटाईज च्या स्टेज ला आहेत

पुढे विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याची इच्छा आहे. चैतन्य म्हणतो मला देखील शेतीमध्ये रस आहे. अभ्यासाची आवड असल्यामुळे कोणताही विषय घेतल्या नंतर आधी मी तो समजावून घेतो आणि मग ती विषय मांडतो. आता आजूबाजूचे शेतकरी, विडियो पाहणारे प्रेक्षक स्वताच वेगवेगळे विषय मला सांगत असतात.माझे वडील देखील मला फार मार्गदर्शन करतात.शेती आणि मातीसाठी कटिबद्ध राहणे इतकेमाझे ध्येय आहे.

आपली शेती आपलं शिवार

YouTube channel Link – https://youtube.com/channel/UCtgosBS6GMI8mrZW_6IDOIg
_______

Chaitanya creation YouTube Channel link – https://youtube.com/c/MaheshKulkarniS
_______

WHAT’SAPP GROUP – https://chat.whatsapp.com/HCQ8lwx4tk9CBgetn2QXTx
_______

FACEBOOK PAGE – https://www.facebook.com/100680929143401/posts/100730705805090/