‘आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार’

मुंबई  – आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत मुंबईत रिपब्लिकन पक्षाचे किमान 25 नगरसेवक निवडून आणण्याचा निर्धार करून कामाला लागण्याचे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांना केले.विक्रोळी येथे ईशान्य मुंबई जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात  काल आठवले बोलत होते.

ईशान्य मुंबईत 1992 च्या पालिका निवडणुकीत 7 नगरसेवक रिपाइं चे निवडून आले होते तर संपूर्ण मुंबईत रिपाइं चे 12 नगरसेवक त्याकाळात निवडून आले होते. रिपब्लिकन पक्ष आता केवळ बौद्धांचा आणि एका जातीचा राहिला नसून सर्व जाती धर्मियांचा पक्ष रिपब्लिकन पक्ष झाला आहे. संपूर्ण देशात रिपब्लीकन पक्ष पोहोचला आहे.झोडपट्टीवासीयांचे गरिबांचे नोकरी चे घराचे प्रश्न रिपब्लिकन पक्ष सोडविण्यात अग्रेसर रिपब्लिकन पक्ष आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून सत्ता आल्यास पहिली अडीज वर्षे रिपाइं चा उपमहापौर तर भाजप चा महापौर होईल. तसेच नंतरची अडीज वर्षे रिपाइं चा महापौर होईल असे भाजप सोबत ठरले असल्याचे ना रामदास आठवले यांनी यावेळी जाहीर केले.तसेच 236 पैकी रिपब्लिकन पक्षाचे 25 नगरसेवक निवडून आले पाहिजेत त्यासाठी कामाला लागा असे आवाहन   आठवले यांनी केले.

मुंबईतील उत्तर भारतीयांच्या संकटात रिपब्लिकन पक्ष उत्तर भारतीयांच्या पाठीशी नेहमी उभा राहिला आहे.उत्तर भररियांचे रोजगार; घर आदी सर्व प्रश्नांवर नेहमी रिपब्लिकन पक्षाचे संघर्षनायक रामदास आठवले यांनी उत्तर भारतीयांना साथ दिली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप आरपीआय युती होणार असून आरपीआय उत्तर भारतीयांनाही मुंबई मनपा निवडणुकीची उमेदवारी देणार असल्याची घोषणा  रामदास आठवले यांनी केली असल्यामुळे येत्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उत्तर भारतीयांनी रिपब्लिकन पक्षाला साथ द्यावी असे आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला यांनी केले.

यावेळी रिपाइं चे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर, मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे, आयोजक स्थानिक जिल्हा अध्यक्ष बाळासाहेब गरुड, श्रीकांत भालेराव, डी एम चव्हाण, मुस्ताक बाबा,योगेश शिलवंत, राजेश सरकार, विलास तायडे, सुमित वजाळे, जयंतीभाई गडा, साहेबराव सुरवाडे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकी च्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे जिल्हानिहाय मेळावे मुंबईत आयोजित करण्यात आले असून आज ईशान्य मुंबईचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. उद्या दि.11 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता भीम छाया सांस्कृतिक केंद्र सांताक्रूझ पूर्व येथे उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याचा रिपब्लिकन पक्षाचा कार्यकर्ता मेळावा जिल्हा अध्यक्ष विवेक पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला असून या मेळाव्यास रामदास आठवले मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच दि.13 डिसेंबर रोजी रिपाइं चा दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याचा मेळावा जिल्हा अध्यक्ष सिद्धार्थ कासारे यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आला आहे.या मेळाव्यांना   रामदास आठवले,अविनाश महातेकर,राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला मुंबई अध्यक्ष गौतम सोनवणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.