‘निकाल गद्दारांना धडा शिकवणारा असणार आहे, कारण त्यांनी केलेली गद्दारी ही कुणालाच मान्य नाही’

Maharashtra Political Crisis – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर गेल्या काही महिन्यांपासून राज्यभरातील चर्चा आणि सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या सुनावणीसाठी आज महत्त्वाचा दिवस आहे. या प्रकरणावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार असून त्याची उत्सुकता महाराष्ट्राबरोबरच अवघ्या देशाच्या राजकीय वर्तुळाला लागलेली आहे. यासंदर्भात न्यायालय नेमका काय निर्णय देणार? याबाबत तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, या निकालाच्या आधी राज्यातील राजकीय वातावरण तापले असून अनेक दावे- प्रतिदावे केले जात आहेत. यातच माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांची देखील महत्वाची प्रतिक्रिया आली आहे. निकाल गद्दारांना धडा शिकवणारा असणार आहे. कारण त्यांनी केलेली गद्दारी ही कुणालाच मान्य नाही. जनतेलाही मान्य नाही. असं ते म्हणाले.

आम्ही सगळे उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) उभे आहोत. एकनिष्ठ शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत. जे गद्दार आहेत त्यांना धडा शिकवणारा आजचा निर्णय असणार आहे. मी हिंदुत्वादी जरी असलो तरी मी देवभक्त आहे. मी कोर्टाला विनंती करू शकत नाही. मात्र मी देवाला प्रार्थना करू शकतो. राज्याचा सत्ता संघर्षाचा निकाल हा निकाल उद्धवजींच्या बाजूने लागू दे अशी प्रार्थनाही मी देवाकडे केली आहे असंही चंद्रकांत खैरेंनी सांगितलं.