‘शरद पवारांचा पाठिंबा आणल्यास CM पद देण्याची मोदींची अजित पवारांना ऑफर’

नागपूर – शरद पवार (Sharad Pawar) सोबत आले तरच तुम्हाला मुख्यमंत्रीपद मिळेल असं भारतीय जनता पार्टीच्या पक्षश्रेष्टींकडून अजित पवारांना सांगण्यात आल्याचा दावा विरोधीपक्ष नेते विजय वड्डेटीवार (Opposition leader Vijay Vaddetiwar) यांनी केला आहे. नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना वड्डेटीवार यांनी अजित पवार (Ajit Pawar)  भाजपाच्या सांगण्यावरुन शरद पवारांचं मन वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचंही म्हटलं आहे.

2 प्रमुख पक्ष पडूनही भाजपाची परिस्थिती सुधारत नसल्यामुळे अजित दादा हे शरद पवार यांना भेटत आहे. लोकनेतृत्व असलेले शरद पवार यांची गरज भाजपाला आहे. त्यांची मदत मिळाल्याशिवाय लोकसभेतील आकडा वाढू शकत नाही. त्यामुळे अजित दादाच्या शरद पवार यांना भेटत आहे, असं वड्डेटीवार म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजित पवार यांना अट घातली आहे की शरद पवार आल्याशिवाय तुम्हाला मुख्यमंत्री होता येणार नाही. म्हणूनच अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी शरद पवारांना वारंवार भेटून सोबत येण्यास आग्रह करत आहेत, असं वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे. शरद पवार सोबत आले नाहीत तर अजित पवार यांना मुख्यमंत्रीपद दिलं जाणार नाही असं वड्डेटीवार यांच्या म्हणण्याचा अर्थ आहे.