मराठा आरक्षणबाबत आज झालेल्या सर्वपक्षीय शासकीय बैठकीवर छत्रपती संभाजीराजे यांचा बहिष्कार

Maratha Reservation: आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे राज्य सरकारच्या वतीने मराठा आरक्षण या विषयावर बोलाविण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीस छत्रपती संभाजीराजे अनुपस्थित राहिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांच्या बाजूला लावलेली त्यांची खुर्ची ही रिकामीच ठेवलेली पाहायला मिळाली.

मराठा आरक्षण विषयक कोणतीही बैठक कधीही न टाळणारे छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhajiraje) आज प्रथमच अशा बैठकीस अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय ठरला होता. या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करत आपली भूमिका स्पष्ट केली असून त्यांनी या बैठकीस पोकळ बैठक असे संबोधत राज्य सरकारसह सर्वपक्षीयांवर देखील मराठा आरक्षण पेक्षा प्रत्येकाला आपापली व्होट बँक सांभाळणे महत्त्वाचे वाटत असल्याचे टीकास्त्र सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल स्वीकारला; कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु

झिरो Subscribers सोबतही You Tubeवरुन कमवा पैसा, ही एक ट्रिक तुम्हाला बनवेल मालामाल!