बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? केतकी चितळेचा सवाल

Maratha Reservation: राज्यात मराठा आरक्षणाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विविध नेत्यांचे घर, बंगले व पक्षांचे कार्यालये तसेच हॉटेलच्या तोडफोडीनंतर मराठा आदोलकांनी शेकडो बस फोडल्या आहेत. बीड, सोलापूर, नांदेडसह महाराष्ट्रातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये आंदोलकांनी एसटी बसवर दगडफेक करत काचा फोडल्या आहेत. या कृत्यावर आता अभिनेत्री केतकी चितळे (Actress Ketaki Chitale) हिने लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे. एसटी बस फोडून आरक्षण (Ketaki Chitale On Maratha Aarakshan) कसे मिळते, असा प्रस्न तिने आपल्या फेसबुक पोस्टद्वारे उपस्थित केला आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत असणाऱ्या केतकी चितळेने एसटी बसच्या काचा फोडनाताचा एक फोटो फेसबुकवर पोस्ट केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिले की, ‘एसटी बस फोडून आरक्षण कसे मिळते बुवा? इंडियाला Uniform Civil Code (UCC) हवा असेल. पण भारताला Uniform Civil Law तसेच Uniform Criminal Law ची गरज आहे. सरकारकडे मागणी करा, सामान्य माणसाला त्रास देऊन काय होणार? आणि एसटी विभाग किंवा बस चालक कसे देणार आरक्षण? चुकून तो दगड चालकाला लागला असता तर?’ असे प्रश्न अभिनेत्रीने उपस्थित केले आहेत. केतकीच्या या पोस्टवर चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

इश्क पर किसका जोर! काकूच्या प्रेमात वेडा झाला पुतण्या, पळून जाऊन लग्नाचं केलं प्लॅनिंग; पण…

मराठा आरक्षणाबाबत सरसकट निर्णय घ्या!- अशोक चव्हाण

रामा राघव फेम अभिनेत्री श्रद्धा पवारचं ‘प्रपोज’ हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला