छोट्या बयोची मोठी स्वप्नं : अभिनेत्री रुचा गायकवाड नकारात्मक भूमिकेत

Actress Rucha Gaikwad : शिक्षणासाठीची जिद्द आणि स्वप्नांची ओढ, असा वेगळा विषय हाताळत ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ (Chhotya Bayochi Motthi Swapna) ही मालिका (Series) प्रेक्षकांच्या भेटीला आली. ‘छोट्या बायोची मोठी स्वप्नं’ या मालिकेत आपल्याला बायोच्या शिक्षणाचा प्रवास पाहायला मिळतो आहे. बायोचा शिक्षणासाठीच्या जिद्दीचा अनोखा प्रवास या मालिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे. भरपूर अभ्यास करून डॉक्टर व्हायचं स्वप्न बघणारी बयो ह्या विषयावर आधारित असलेली ही मालिका आहे. बयो आता मोठी झालेली दिसणार आहे. बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर (Actress Vijaya Babar) दिसत आहे तर इराच्या भूमिकेत अभिनेत्री रुचा गायकवाड (Actress Rucha Gaikwad) हि अभिनेत्री पाहता येणार आहे. ‘छोट्या बयोची मोठ्ठी स्वप्नं’ या मालिकेत रुचा नकारात्मक भूमिकेतून पाहायला मिळणार आहे. ती पहिल्यांदाच नकारात्मक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बयो आणि इरा एकाच मेडिकल महाविद्यलयात शिकणार आहेत तर त्यांच्यातील नोकझोक मालिकेत पाहायला मिळतील. तर आता मालिकेत विजया बाबर आणि रुचा गायकवाड या दोनीही अभिनेत्री एकत्र काम करताना दिसणार आहेत.

बयो आता मुंबईमध्ये दाखल झाली असून मुंबईतील विज्ञान महाविद्यालयामध्ये शिकायला येणार आहे. आता बयोच्या भूमिकेत अभिनेत्री विजया बाबर ही गुणी अभिनेत्री दिसणार आहे. आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेत असून छोटी बयो मोठी होणार आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकाला सुद्धा वळण आलेले पाहायला मिळेल. आपल्या भावासोबत मुंबईत स्थायिक असलेल्या इरसाठी हे चॅलेंज ठरणार आहे जेव्हा बयो त्यांच्या कॉलेज मधेच शिकायला येणार आहे. बयो मुंबईमध्ये आल्यावर मुंबईच्या वेगाशी कसं जुळवून घेते, हे आता मालिकेतून पाहायला मिळेल. मुंबई- कोकणात राहणारी सर्वसामान्य मुलगी डॉक्टर होण्याचे स्वप्न मनी बाळगते आणि त्या दिशेने आपली वाटचाल करते. तिच्या या खडतर प्रवासात अनेक काटे येतात. पण त्यावरही मात करून ती पुढे जात असते. ही गोष्ट आहे सोनी मराठी वाहिनीवरील छोट्या वयाची मोठी स्वप्न या मालिकेतील आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde