नेपाळसारख्या संघाने भारताविरुद्ध २३० धावा केल्या, मग पाकिस्तान तर…; दानिश कानेरियाने उडवली भारताच्या गोलंदाजी फळीची खिल्ली

Danish Kaneria: टीम इंडियाने आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) पहिल्या फेरीत नेपाळविरुद्ध 230 धावा दिल्या. शेवटी डीएलएस मेथडनुसार भारताने नेपाळचा 10 गडी राखून पराभव केला. पण नेपाळ सारख्या निम्न क्रमवारीत असलेल्या संघाने दर्जेदार भारतीय गोलंदाजीसमोर अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. त्यामुळे भारताचे गोलंदाजी आक्रमण हा भारतीयांसाठी चिंतेचा विषय बनला असावा, असे मत पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कानेरिया (Danish Kaneria On Indian Bowling Attack) याने व्यक्त केले आहे.

आपल्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना कानेरिया म्हणाला की, “नेपाळकडे अनुभवी फलंदाजी लाइनअप नाही. तरीही जर भारताविरुद्ध ते 200 पेक्षा जास्त धावा करू शकले तर पाकिस्तान भारतीय गोलंदाजी आक्रमणासमोर काय करेल याची कल्पना करा”. अशा शब्दांत त्याने भारताच्या गोलंदाजी फळीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

“भारतीय निवड समितीने भारताच्या गोलंदाजीतील अडचणींकडे लक्ष द्यायला हवे होते. कर्णधार रोहित शर्माही खूप गोंधळलेला दिसतो. या ट्रॅकवर हा संघ 300 धावांचा बचावही करू शकेल की नाही याची त्याला खात्री वाटत नाही. त्यांच्या फलंदाजीचाही तोच मुद्दा आहे, ” असेही कानेरिया म्हणाला.

महत्त्वाच्या बातम्या-
Jalana Lathi Charge : देवेंद्र फडणवीसांनी गुन्हा केला म्हणून तर माफी मागितली :– नाना पटोले
‘तीन अडकून सीताराम’चा अनलिमिटेड धिंगाणा; चित्रपटाची उत्कंठा वाढवणारा टिझर प्रदर्शित
ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार – Eknath Shinde