मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या तानाजी सावंतांच्या बचावासाठी मैदानात उतरले चंद्रकांत पाटील

Pune – शिंदे फडणवीस सरकारमधील मंत्री असलेले तानाजी सावंत(Tanaji Sawant) यांनी मराठा आरक्षणावरुन विरोधकांनर निशाणा साधताना एक वादग्रस्त वक्तव्य(Controversial statement) केले आहे. सत्तांतर झाल की लगेच विरोधकांना मराठा आरक्षणाची खाज सुटली आहे. असं वादग्रस्त वक्तव्य उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तानाजी सावंत यांनी केले आहे.

यांना आरक्षण पाहिजे. आता म्हणतात ओबीसी मधून पाहिजे. उद्या म्हणतील एस सी मधून पाहिजे याचा सगळा करता करविता कोण हे सगळ्यांना चांगल माहीत असंही ते म्हणाले. दोनवेळा आरक्षण गेल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. पण आता राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला लगेच मराठा आरक्षणाची खाज सुटली, असे वक्तव्य तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी केले आहे.

दरम्यान, आता तानाजी सावंत यांच्या बचावासाठी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पाठराखण केली असून तानाजी सावंतांच्या बचावासाठी चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत.तानाजी सावंत यांनी एखाद्या वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं. त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचा फरक समजून घेतला पाहिजे. असं ते म्हणाले.

आमच्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत नेहमी हेच होतं. पण ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की ते म्हणतात यात काय आहे तसं त्यांना म्हणायचं नव्हतं. तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचं होतं की मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून पहिल्यांदा देवेंद्रजी यांनी दिलं म्हणजे बीजेपी सरकारने दिलं ते हायकोर्टात टिकवलं ते सुप्रीम कोर्टात एक वर्ष टिकवलं मग अडीच वर्षात आंदोलन का केली नाही ?, असं तानाजी सावंत यांना म्हणण्याचा अर्थ आहे. माझी हात जोडून विनंती आहे की ज्यावेळी एखादी मागणी तेव्हा उठ सूट गैरसमज करून घेण्याचा काही गरज नाही. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याचा एवढाच अर्थ आहे की अडीच वर्ष का शांत बसला ? त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की आता आपलं सरकार आलंय आपण करूयात.असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.