मुंबईत आमदारांसाठी 300 घरं बांधणार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांनी एक मोठी घोषणा केलीय. आमदारांना मुंबईत कायमस्वरुपी घर मिळावं (Home In Mumbai) अशी मागणी बुधवारी विधानसभेत शिवसेना आमदारांकडून करण्यात आली होती. त्याच धर्तीवर आज मुख्यमंत्र्यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे.

आमदारांसाठी आता मुंबईत 300 घरं बांधणार असल्याची घोषणा (Homes For Mla) मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलीय. महाविकास आघाडीचं सरकार फक्त बोलणारं नाही तर करून दाखवणारं सरकार आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकांच्या घरांचा प्रश्न आणि लोकप्रतिनिधी यांच्या घराचा ही प्रश्न आहे. आमदारांना घरेही मिळणार आहेत. आमदारांसाठी 300 घरं बांधणार आहोत, सर्वपक्षीय आमदारांना घरं आवश्यक आहेत, आमदारांनाही चांगल्या घरांची गरज, कायमस्वरुपी घरं देणार, असं मुख्यमंत्री म्हणाले. आपण विचार करुन घोषणा करतो त्यानंतर काम करतो. पत्राचाळ अनेक दिवसांचा प्रश्न होता. झिम्मा फुगडी सुरु होते. आता त्या कामाला सुरुवात झाली आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.