धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली, अनेक बायकाही लपवल्या – करुणा शर्मा

कोल्हापूर – कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत करुणा शर्मा मुंडे या आपले नशीब आजमावत आहेत. करुणा शर्मा यांनी शिवशक्ती सेना पक्ष स्थापन केला असून याच पक्षाकडून त्या रिंगणात उतरल्या आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याआधी कोल्हापुरातील करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जनतेचा आवाज म्हणून विधानसभेत जाण्याची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं.

दरम्यान, यावेळी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना देखील त्यांनी लक्ष्य केले.धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या, असा गंभीर आरोप करुणा मुंडे यांनी यावेळी केला.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू आहे असल्याचं करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितलं. तसेच कोल्हापुरातील घराणेशाहीचं राजकारण आपण संपवणार आहोत. त्यामुळेच कोल्हापूरचा विकास थांबला आहे. देवीच्या आशीर्वादाने विजय प्राप्त होण्याचा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.