मुंबई डबेवाले आणि चर्मकार असोशिएशन यांना ठाण्यात मिळणार बारा हजार घरे

Devendra Fadnavis- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मुंबई डबेवाला आणि चर्मकार असोशिएशन यांची अनेक दिवसापासून हक्कांची घराचे मागणी होती. यासाठी आमदार श्रीकांत भारतीय व अॅड. अमृता गुरव यांचे माध्यमातून पाठपुरावा चालू होता. याबाबती देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थानी नुकतीच बैठक संपन्न झाली असून अनेक वर्षापासूनचे घराचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. त्याबाबतीत सदरचे बैठकीसाठी दिवे अजूंर ठाणे येथील जागा मालक रूद्रप्रताप त्रिपाठी, मुंबई डबेवाला असोसिएशनचे पदाधिकारी व चर्मकार निवारा असोसिएशनचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठक झाली असून सदर बैठकीत दिवे अंजूर ठाणे येथे ४६ एकर जागेत १२००० घरे पंतप्रधान आवास योजनेखाली मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यासाठी लागणारी सर्व कार्यवाही म्हाडा मार्फत पूर्ण करण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी आदेशित केले.

सदरचा प्रकल्प हा पब्लिक प्रायवेट पार्टनरशिप तत्वावर करण्यात येणार असून या माध्यमातून डबेवाले असोसिएशन आणि चर्मकार असोसिएशन यांना सेलेबल ५०० स्क्वे. फूटची १२००० घरे ४६ एकर जागेवर देण्यात येणार आहे. सदर गृहप्रकल्पात मंदीर व गोशाळा, शाळा, हॉस्पिटल, गार्डन, शॉपिंग सेंटर, कम्युनिटी हॉल, व्यायामशाळा यासारख्या अनेक अॅमेनिटी देण्यात येणार आहे असे जागा मालक त्रिपाठी यांनी सांगितले. डबेवाला असोशिएशन व चर्मकार असोशिएशनची २५ वर्षापासूनची हक्काचे घराची मागणी आज पूर्णत्वास आली. देवेंद्र फडणवीस यांनी जमीन मालक त्रिपाठी यांना १२००० घरांसाठी शासनातर्फे आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन दिले सदरचे बैठकीस मुंबई टिफीन बॉक्स असोशिएनचे अध्यक्ष उल्हास मुके, रामदास करवंदे सचिव किरण गवांदे व सदस्य, चर्मकार निवारा असोसिएशनचे अध्यक्ष अशोक गायकवाड, सचिव विभीषण कानडे व सदस्य, त्यांचे कायदेशिर सल्लागार अॅड. दिगंबर देशमुख, अॅड. जयश्री माने हे उपस्थित होते. सदरचे बैठकीचे आयोजनाचे सर्व श्रेय आमदार श्रीकांत भारतीय व अॅड. अमृता गुरव यांना देण्यात आले आहे.या निर्णयामुळे मुंबई डबेवाले आणि चर्मकार आसोसीएशन यांनी अतिशय आंनद व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

Loksabha Election Dates : महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका; कोणत्या तारखेला कुठे मतदान?

निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यावर कोणत्या गोष्टींवर बंदी घालण्यात येते? जाणून घ्या सर्वकाही

मनसेतून राजीनामा देऊनही उपयोग झाला नाही, वसंत मोरे यांचं खासदार बनण्याचं स्वप्न फक्त स्वप्नच राहणार?