इस्रोच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन मोदींनी केल्या ‘या’ ३ महत्वाच्या घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) चांद्रयान 3 मोहिमेत सहभागी शास्त्रज्ञांना भेटण्यासाठी बेंगळुरूमधील इस्रोच्या कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्समध्ये पोहोचले . चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले.   यासोबतच संपूर्ण देशवासियांचा ऊर भरून येईल आणि सर्वांनाच अभिमान वाटेल अशा  तीन घोषणा देखील मा. मोदींनी केल्या आहे.

ज्या जागेवर चांद्रयान ३ चं मून लँडर उतरलं आहे, त्या पाँईटला शिवशक्तीच्या नावाने ओळखलं जाईल. चांद्रयान २ ने जिथे आपली पावलं ठेवली आहेत ती जागा आता तिरंगा या नावाने ओळखली जाणार आहे. याशिवाय भारत दरवर्षी 23 ऑगस्ट हा ‘नेशनल स्पेस डे’ म्हणून साजरा करेल अशी घोषणा देखील केली आहे.  भारतीय शास्त्रज्ञांनी हि दैदिप्यमान कामगिरी करून  अनेक पिढ्यांवर छाप सोडलीय, तुमचं यश कित्येक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

यावेळी मोदी म्हणाले,  तुम्ही साधना केली आहे. तुम्ही जे काम केलंय, तुमचा जो प्रवास घडलाय, तुमचा जो संघर्ष आहे तो एवढा सोपा नव्हता. देशातील जनतेला त्याची माहिती व्हायला हवी. मून लँडरची सॉफ्ट लँडिंग व्हावी म्हणून आपल्या शास्त्रज्ञांनी याच सेंटरमध्ये आर्टिफिशियल चंद्र तयार केला. तिथे असंख्य प्रयोग केले. अनेक टेस्ट केल्या. आता एवढ्या परीक्षा दिल्यानंतर तुम्हाला यश मिळणारच ना? असं सांगतानाच या यशानंतर भारताच्या तरुण पिढीत उत्साह संचारला आहे. विज्ञान, अंतराळ आणि नव्याचा ध्यास याबाबत तरुणांमध्ये अत्यंत उत्साह वाढला आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.