गब्बर पंजाबच्या ताफ्यात ! तब्ब्ल ‘इतक्या’ कोटीची लागली बोली

मुंबई : भारताचा सलामीवीर शिखर धवनकडे आयपीएलच्या लिलावात सगळ्यांच्या नजरा लागून राहिल्या होत्या. भारताचा सलामीवीर रोहित शर्मा यांच्या साथीने धवनने अनेक मोठ्या खेळी साकारल्या आहेत. या वर्षी शिखर धवनला पंजाब किंग्ज संघाने ८.२५ कोटी बोली लावून आपल्या ताफ्यात घेतलं आहे. शिखर धवन या अगोदर आयपीएलमध्ये मुंबई, दिल्ली ,हैदराबाद नंतर पुन्हा दिल्ली कडून खेळला होता.

भारताचा गब्बर म्हणून शिखर धवनची ओळख झाली आहे. मागच्या वर्षी धवनने धावांचा अक्षरशः पाऊस पाडला होता. २०१९ च्या आयपीएलच्या हंगामात धवनने ५२० धावा चोपल्या होत्या तर २०२० च्या हंगामात देखी त्याने दमदार कामगिरी करत ६१८ धावा काढल्या. २०२१ मध्ये त्याने ५८७ रन केले. विशेष म्हणजे आयपीएल २०२० मध्ये धवनने लागोपाठ दोन सामन्यांमध्ये दोन शतकं ठोकली होती.

आयपीएलच्या हंगामात दमदार कामगिरी केल्यानंतर ही धवननला मागील आंतरराष्ट्रीय टी-२० विश्वचषकात देखील स्थान देण्यात आले नव्हते. यामुळे चाहते फार नाराज झाले होते. परंतु धवनने आयपीएलच्या हंगामात केलेल्या कामगिरीच्या बळावर पंजाब संघाने त्याला आपल्या संघात समावेश करून घेतलं आहे.