Interim Budget 2024 | निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे- ठाकरे

Interim Budget 2024: देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्या आधीचा हा मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प (Interim Budget 2024) होता. अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला. आता या अर्थसंकल्पावर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची प्रतिक्रिया आली असून त्यांनी निर्मला सीतारामन आणि मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा ‘शेवटचा’ अर्थसंकल्प मांडला. त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी यापुढे देशात चार जातींसाठी काम करणार असं सांगितलं. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. त्यांनी हे मोठं धाडस केलंय. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलंय. कारण निवडणुका आल्यानंतर का होईना पंतप्रधानांनी सांगितलं की सुटाबुटातल्या मित्रांच्या पलीकडेही हा देश आहे. १० वर्षं झाली, दहाव्या वर्षी तुम्हाला या चार जाती कळल्या. तुमच्याबरोबरचे अडाणी म्हणजे देश नाही हे तुम्हाला आता कळलं, अशा शब्दांत ठाकरेंनी केंद्र सरकारवर वार केला.

तसेच मग सीतारमणजी, महिलांकडे तुम्हा लक्ष देत आहात, तर मणिपूरमध्ये का जात नाहीत हो?, असा कटू सवालही यावेळी ठाकरेंनी केला.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी