रब्बी 2021 हंगामासाठी सातबारा व आधारकार्ड व्दारे अनुदानित दराने ज्वारी, हरभरा व गहु बियाणे उपलब्ध

लातूर :- रब्बी 2021 हंगामामध्ये रार्ष्टीय अन्न सुरक्षा अभियाना अंतर्गत प्रमाणीत बियाणे वितरणामध्ये सातबारा व आधारकार्ड व्दारे अनुदानीत दराने सु.ज्वारी, फुले रेवती, फुले वसुधा, परभणी मोती व एम-35-1 (मालदांडी) हरभरा – राजविजय-202 फुले विक्रम, फुले विक्रांत व पिडी. के.व्ही. कांचन बियाणे महाबीज विक्रेते व उपविक्रेत्याकडे उपलब्ध् झाले आहे. त्यासाठी लॉटरी मध्ये ज्यांची नावे आहेत. तसेच ज्वारी व हरभरा पिकासाठी त्यांची नावे लॉटरीसाठी नोंदणी केली नसतील तर अशा शेतकऱ्यांनी त्यांची सातबारा, आधार कार्डची झेरॉक्स प्रत देऊन महाबीज विक्रेते व उपक्रिते यांच्याकडे अनुदानीत दराणे बियाणे खरेदी करावे. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त क्षेत्रानुसार 5 एकर पर्यंतचे बियाणे अनुदानीत दराने घेता येईल.

तसेच ग्राम बिजोत्पादन योजनेअंतर्गत अनुदानीत दराने हरभरा जॅकी-9218 व गहु बियाणे एका एकर क्षेत्रासाठी अनुदानीत दराने बियाणे मिळेल. अनुसुचित जाती व जमातीच्या शेतकऱ्यांनी महाबीज विक्रेते व उपविक्रेते यांचेकडे सातबारा, आधारकार्ड झेरॉक्स प्रत देऊन महाबीज विक्रेता व उपविक्रेत्याकडून अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे. सदरील बियाणे उपलब्ध् असे पर्यंत अनुदानीत दराने मिळेल व प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य राहील याची नोंद घ्यावी.

अनुदानीत दराने सु.ज्वारी, 4 किलो बॅगची, फुले रेवती किंमत रु. 120 प्रति बॅग फुले वसुधा, मालदांडी प्रति बॅग 124 परभणी मोती व परभणी ज्योती रु. 152 प्रति बॅग व हरभरा 20 किलो पॅकींगची राजविजय-202, फुले विक्रम, फुले क्रिांत, एकेजी-1109 यावाणाची किंमत रु. 1220 प्रति बॅग या दराणे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत प्रमाणीत बियाणे वितरणा करीता उपलब्ध् आहे.

तसेच ग्रामविजोत्पादन योजनेअंतर्गत हरभरा जॅकी-9218 अंतर्गत 30 किलोची बॅग रु. 1650 प्रति बॅग प्रमाणे व गहु 10 वर्षा आतिल वाणाचे बियाणे 40 किलो रु. 920 प्रति बॅग 10 वर्षा वरील वाणाची 40 किलोची बॅग रु. 840 प्रति बॅग प्रमाणे उपलब्ध् आहे.तरी शेतकऱ्यांनी महाबीजल विक्रेते व उपविक्रते यांचेकडे सातबारा, आधारकार्ड देऊन अनुदानीत दराने बियाणे खरेदी करावे व योजनेचा लाभ घेण्यात यावा. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, लातूर जिल्हा व्यवस्थापक महाबीज लातूर यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

https://www.youtube.com/watch?v=G4H1kdtPdh0

Previous Post

कोणतेही काम सचोटीने केलं तर प्रगती नक्कीच होते- छगन भुजबळ

Next Post

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माजी सैनिकांसाठी पद भरती

Related Posts
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अंतिम टप्प्यात, इस्लामपूर येथे सांगता सभा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची शिवस्वराज्य यात्रा अंतिम टप्प्यात, इस्लामपूर येथे सांगता सभा

Shivswarajya Yatra | ऑगस्ट क्रांती दिन आणि जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी छत्रपती शिवाजी महाराज…
Read More
पंढरपूरला जिल्ह्याचा दर्जा द्या; विधानसभा चर्चेत आमदार अभिजीत पाटील यांची मागणी

पंढरपूरला जिल्ह्याचा दर्जा द्या; विधानसभा चर्चेत आमदार अभिजीत पाटील यांची मागणी

महाराष्ट्र विधानसभा नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेत आमदार अभिजीत पाटील (Abhijeet Patil) यांनी विविध विकासकामांसाठी शासनाकडे मागण्या केली.…
Read More
‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उचलला की षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात’

‘ओबीसी आरक्षणाचा प्रश्न उचलला की षडयंत्रकारी लोक मराठा आरक्षणाचा मुद्दा काढतात’

औरंगाबाद : औरंगाबादेत आज भाजपच्या ओबीसी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्याला माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे या…
Read More