कोरोनाची चौथी लाट, महाराष्ट्रात अनलॉक! वाचा विजय वडेट्टीवार नेमकं काय म्हणाले ?

मुंबई : सध्या राज्यात कोरोनाची तिसरी लाट ओसरत चालली आहे. महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या देखील झपाट्याने खाली येताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये नवी मुंबई, ठाणे, मुंबई ह्या मोठ्या शहरात निम्या रूग्णसंख्या कमी होत असल्याने राज्य अनलॉकच्या दिशेने वाटचाल करण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी यावर मत व्यक्त केले आहे. परंतु याचवेळी त्यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेविषयी भाष्य केलं आहे.

काही देशांमध्ये कोरोनाच्या नव्या विषाणूचं संकट डोक्यावर आलं आहे. त्यामुळे देशात चौथी लाट येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोनाची चौथी लाट किती तीव्रतेची असेल याबद्दल आपण वृत्तपत्रांमधून वाचत आहोत. चौथी लाट ही ओमायक्रॉन विषाणूपेळा जास्त भयंकर असेल आणि त्यांचा वेग ही ओमायक्रॉनपेक्षा जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे अजूनही आपण मास्क किंवा कोरोनासंदर्भात नियम पाळले तर येणाऱ्या संकटाला आपण सामोरं जावं लागणार नाही, असं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

येणाऱ्या काळात महाराष्ट्र बऱ्यापैकी अनलॉक होईल. त्याबाबतीत मुख्यमंत्री आठवड्यातील दोन ते तीन दिवसातून आढावा घेऊन निर्णय घेत आहेत. यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री यांनी महिन्याच्या सुरुवातीला अत्यंत सावधतेने पाऊल टाकल्यामुळे तिसऱ्या लाटेमध्ये राज्यात कमी हानी झाली. ही लाट जेवढया वेगाने वाढली. तेवढया वेगाने ती खाली देखील आली.

महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. बऱ्यापैकी जिम्स सुरू झाल्या आहेत. मंगल कार्यालयमध्ये लोकांची संख्या वाढायला लागली आहे. राज्यात निर्बंध कडक लावले होते, परंतु कडक अंमलबजावणी केली नाही. या महिन्याच्या शेवटी महाराष्ट्र पूर्णतः अनलॉक होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अनलॉक होत असताना मास्क मुक्त महाराष्ट्र वगैरे नाही तर मास्क घालणं आवश्यक असल्याचंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलं.