Shivajirao Adhalrao Patil | “गेल्या पाच वर्षात मतदारसंघात आपला खासदार फिरकलाच नाही”, आढळरावांचा कोल्हेंना खोचक टोला

Shivajirao Adhalrao Patil | गेल्या पाच वर्षात आमच्या मतदारसंघाला खासदारच नव्हता. भारतातील असा एकमेव हा लोकसभा मतदारसंघ होता. अस म्हणत महायुतीचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर घणाघात चढवला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ कवठे येमाई येथे निर्धार मेळावा आयोजित केला होता. त्यावेळी ते बोलत होते.

जनतेकडून आम्ही वचनं घेतली म्हणून आम्ही प्रत्येक भागात गोरगरिबांसाठी जनता दरबार भरवतो. यासाठी ठिकठिकाणी माझी कार्यालय लोकांसाठी सुरू केली आहेत. मात्र मागच्या खासदाराने तुमची आमची सर्वांची फार निराशा केली आहे.  गेल्या पाच वर्षात या मतदारसंघाला खासदारच नव्हता. आपल्या मतदारसंघात खासदार फिरकलाच नाही. त्यामुळे भारतातील हा असा एकमेव मतदारसंघ होता की या मतदारसंघात खासदार नव्हता. असे म्हणत आढळरावांनी कोल्हे यांच्यावर प्रखर शब्दात टिका केली.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, मागची निवडणुक झाली. त्यात खासदार निवडून गेले पण त्यानंतर खासदार गायब होता. असेही आढळरावांनी सांगितले. त्यावर आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांऐवजी फक्त टिका करत आहेत. त्यांच्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मात्र मी त्यांचं वय पाहता त्यांना एवढ्याच शुभेच्छा देतो की गेट वेल सुन असे म्हणत कोल्हेंनी त्यावर पलटवार केला.

दरम्यान, निवडणुकीसाठी आता शिरूरमध्ये प्रचार शिगेला पोहचला आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी काल कवठे येमाई येथे निर्धार मेळावा घेतला. या मेळाव्यात महायुतीतील घटक पक्षांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी झाडून हजेरी लावली. त्यावर महायुतीच्या पाठीशी असलेला माय बाप जनतेचा भक्कम पाठिंबा अमुल्य असल्याचे शिवाजीराव आढळरावांनी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol यांच्या प्रचारात ‘होम मिनिस्टर’ही सक्रिय! मोनिका मोहोळांचा ६ विधानसभा मतदारसंघातील भेटीगाठींचा टप्पा पूर्ण

Pune LokSabha 2024 | मनसेने महायुतीला पाठिंबा दिल्याने पुण्यात मतांचं विभाजन, मुरली अण्णांना होणार फायदा?

Shirur LokSabha 2024 | फक्त पोपटपंची करणारा नव्हे तर प्रत्येकाच्या अडीअडचणीत धावून येणारा खासदार हवा- जुन्नरचे आमदार अतुल बेनके