एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे! सिराजने सामनावीराची बक्षीस रक्कम ग्राउंड्समनला केली अर्पण

Asia Cup Final: भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात आज कोलंबोच्या मैदानावर आशिया चषकाचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागेल. श्रीलंकेचा संघ अवघ्या ५० धावांवर बाद झाल्याने भारताला सोपे लक्ष्य मिळाले. भारताच्या सलामी जोडीने ७ षटकातच लक्ष्य गाठत आशिया चषक जिंकला. आशिया चषकावर आपले नाव कोरण्याची ही भारताची आठवी वेळ आहे.

या सामन्याचा खरा शिल्पकार राहिला मोहम्मद सिराज. सिराजने (Mohammed Siraj) ७ षटके टाकताना केवळ २१ धावा देत ६ विकेट्स घेतल्या. त्याच्या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्कारानेही गौरवण्यात आले. यानंतर सिराजने मनाचा मोठेपणा दाखवत सर्वांचे हृदय जिंकले.

सिराजने त्याला सामनावीर म्हणून मिळालेली बक्षिसाची रक्कम आर प्रेमदासा स्टेडियमच्या ग्राउंड्समनला दान केली. त्यांच्या मेहनतीशिवाय आशिया चषक होऊच शकला नसता, असे गौरवोद्गारही यावेळी त्याने काढले. सिराजने ५ हजार डॉलर्सची रक्कम कोलंबोच्या ग्राउंड स्टाफला बक्षीसपोटी दिली. त्याच्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

https://youtube.com/shorts/QFDIhtpAuy8?si=Ga9BitaTLLABB_WR

महत्त्वाच्या बातम्या-
Video : मोहम्मद सिराज नव्हे, तर रोहित शर्माने आशिया चषक दुसऱ्याच खेळाडूकडे सोपवला
फायनलमध्ये अशी कामगिरी करणे तुमची मानसिक ताकद दर्शवते; कर्णधार रोहितचा आनंद गगनात मावेना
अभिनेत्री Zareen Khan विरोधात अटक वॉरंट; जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण

You May Also Like