Covid-19: कोरोनाच्या नवीन प्रकारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी या आरोग्यदायी सवयींचा अवलंब करा

चीनमध्ये (China) कोरोनाची (Corona) अनेक प्रकरणे समोर येत आहेत. अशा परिस्थितीत भारतातील लोकांची चिंता खूप वाढली आहे. कर्फ्यू आणि लॉकडाऊनमुळे (Curfew and Lockdown) लोक पुन्हा एकदा चिंतेत आहेत. नुकतेच इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) डॉ. अनिल गोयल म्हणाले होते, ‘भारतातील 95 टक्के लोकसंख्येची कोरोना विरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे, त्यामुळे देशात लॉकडाऊन होणार नाही.’ ते म्हणाले, ‘भारतीयांची प्रतिकारशक्ती चिनी लोकांच्या तुलनेत खूपच मजबूत आहे.

भारताला कोविडशी लढण्याच्या जुन्या सूत्राकडे परत जाण्याची गरज आहे – चाचणी, उपचार आणि ट्रेसिंग. यासोबतच भारतात लॉकडाऊनची गरज भासणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र असे असतानाही डॉक्टरांनी लोकांना या बाबतीत सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास सांगितले आहे. ब्राझील, अमेरिका आणि जपानप्रमाणे चीनमध्येही कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारतही अॅक्टिव्ह मोडमध्ये आला आहे.

सर्व पॉझिटिव्ह केसेसच्या जीनोम सिक्वेन्सिंगसाठी सरकारकडून राज्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 2020-2021 मध्ये, भारतात कोविड-19 ची प्राणघातक लाट आली, ज्यामुळे देशभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला. चीनमध्येच कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असले तरी, सुरक्षा न घेतल्यास भारतातही पुन्हा एकदा कोरोनाचा फैलाव होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, चला जाणून घेऊया या गोष्टींबद्दल…

स्वच्छतेची घ्या विशेष काळजी-

कोरोनाचा धोका टाळण्यासाठी स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याचे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. आपले हात वेळोवेळी पाण्याने आणि साबणाने धुत राहा तसेच सॅनिटायझर वापरा. शिंकताना किंवा खोकताना, आपले तोंड आणि नाक आपल्या कोपराने किंवा टिश्यूने झाका. दरवाजाची हँडल, नळ आणि फोन स्क्रीन रोज स्वच्छ करा. कारण या गोष्टींना सर्वाधिक स्पर्श केला जातो.

मास्क घाला-

घराबाहेर पडताना नेहमी मास्क वापरा आणि तोंड आणि नाक व्यवस्थित झाका. मास्क घालण्यापूर्वी आपले हात पूर्णपणे स्वच्छ करा. याशिवाय मास्क काढल्यानंतर पुन्हा हात धुवा. तसेच, मास्क दररोज धुवा. तुम्ही डिस्पोजेबल मास्क वापरत असल्यास, ते एकापेक्षा जास्त वेळा वापरू नका.

तुमच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवा-

तुमच्या आजूबाजूला कोणाला खोकला, ताप किंवा सर्दी असेल तर त्या व्यक्तीजवळ जाणे टाळा. WHO ने 3C (बंद, गर्दी, जवळचा संपर्क) टाळण्याचा सल्ला दिला आहे ज्यात बंद ठिकाणे, गर्दी आणि एखाद्याच्या खूप जवळ जाणे समाविष्ट आहे. दुसरीकडे, जर तुम्ही घराच्या आत असाल तर, खिडक्या आणि दरवाजे वायुवीजनासाठी उघडे ठेवा. दुसरीकडे, तुम्ही बाहेर कोणाला भेटत असाल तर मास्क घाला.

डब्ल्यूएचओच्या मते, जर कोणी आजारी असेल तर त्याने स्वतःला आणि इतरांना कोविड -19 पासून सुरक्षित ठेवण्यासाठी योग्य मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले पाहिजे.

ताप, कफ असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा.

लक्षात ठेवा की तुम्ही लसीकरण डोस आणि वूस्टर डोस दोन्ही घेतले आहेत. जर तुम्हाला स्वतःमध्ये कोणतेही बदल दिसले तर यासाठी ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. कोविड लक्षणांमध्ये ताप, कोरडा खोकला, थकवा, वास कमी होणे, अन्नाची चव कमी होणे. कोविड-19 च्या इतर लक्षणांमध्ये डोकेदुखी, घसा खवखवणे, डोळे लाल आणि खाज सुटणे, अतिसार, त्वचेवर पुरळ यांचा समावेश होतो.