Vijay Shivtare | बारामती जागेच्या वादावरून शिवसेना नेते विजय शिवतारे मुख्यमंत्र्यांना भेटणार

Vijay Shivtare | लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून बारामती लोकसभा मतदारसंघावर सर्वांचे लक्ष असणार आहे. येथे पवार विरुद्ध पवार लढत पाहायला मिळू शकते. त्यातच निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतीलच नेत्याने अजित पवार (Ajit Pawar) यांना चॅलेंज दिले आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare ) यांनी अजित पवारांविरोधात वक्तव्य करताना मोठी घोषणा केली आहे. बारामतीतून अपक्ष म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय विजय शिवतारे यांनी जाहीर केला. त्यामुळे बारामतीत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते.

अजित पवारांनी आपल्या केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी विजय शिवतारे बारामतीतून लोकसभा लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. काहीही झालं तरी अपक्ष उभा राहण्यावर विजय शिवतारे ठाम असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना बंगल्यावर भेटायला बोलावले आहे. या भेटीत मुख्यमंत्री विजय शिवतारेंची समजूत घालण्याचा प्रयत्न करू शकतात. कारण विजय शिवतारेंच्या भूमिकेमुळे अजित पवारांच्या अडचणी वाढू शकतात. आता या भेटीत काय घडते?, याकडे सर्वांचे लक्ष असेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार