सुशीलकुमार शिंदेंना भाजपाची ऑफर नाही, चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

Sushilkumar Shinde:- आम्ही कुणालाही आमदारकी, खासदारकीसाठी पक्षात या असे म्हणणार नाही. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचे नेतृत्व स्वीकारायला कुणी तयार असेल व पक्षात प्रवेश येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागत करणार, असे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले.

ते सोलापूर दौऱ्यात माध्यमांशी संवाद साधत होते. बावनकुळे म्हणाले, भाजपने सुशीलकुमार शिंदे किंवा प्रणिती शिंदेला ऑफर दिली नाही. आमच्या पक्षाला तशी गरज नाही, पण कुणीही जर आमचा दुपट्टा घालायला तयार असेल तर आम्ही तयार आहे.

उद्धव ठाकरेंवर टीका करताना बावनकुळे म्हणाले की, नरेंद्र मोदी हेच अखंड भारत करू शकतात, असे उद्धव ठाकरे व संजय राऊत म्हणाले होते. ज्या काँग्रेस पार्टीने रामाला, रामसेतूला काल्पनिक म्हटले आहे अशा लोकांसोबत उद्धव ठाकरे आहेत. ठाकरे यांच्या सर्व आक्षेपांना राहुल नार्वेकर यांनी उत्तर दिले आहे.

• संसदीय मंडळ ठरवेल
उमेदवार ठरविण्याचा अधिकार भाजपाच्या संसदीय समितीला असून, महायुतीमधील तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून कोणाला कोणती जागा द्यायची हे ठरवतील. त्यावर संसदीय मंडळ निर्णय घेईल, असेही बावनकुळे म्हणाले.

• जितेंद्र आव्हाड स्टंटबाज
जितेंद्र आव्हाड हे स्टंटबाज आहेत, त्यांना काही तरी बोलायचे असते. त्यांना न्यायव्यवस्थेवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांचे न्यायव्यवस्थेबाबत बोलने योग्य नाही. त्यांना काहीतरी बोलून स्टंटबाजी करायची आहे. त्यापूर्वी त्यांनी प्रभू श्री रामचंद्रावरही बोलले होते. महाराष्ट्राची सामाजिक स्वास्थ बिघडेल असे विधाने करू नये, असा सल्लाही बानवकुळे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्त्वाच्या बातम्या-

नितेश तिवारीच्या ‘रामायण’मध्ये बॉबी देओल कुंभकर्णाच्या भूमिकेत दिसणार? जाणून घ्या सत्य

‘हे’ आहेत जगातील सर्वोत्तम तांदूळ, तांदळाची ‘ही’ भारतीय जात पहिल्या क्रमांकावर

अरे हे काय? इशानसाठी देशापेक्षा IPL महत्त्वाचे! मुंबई इंडियन्सकडून खेळण्यासाठी टीम इंडियातून बाहेर

Sharad Mohol : शरद मोहोळ प्रकरणात अटकेत असणारा विठ्ठल शेलार नेमका कोण आहे?