Crime News | निमंत्रण पत्रिका द्यायला आले आणि गोळी झाडली… भाजपच्या जिल्हा मंत्र्याची हत्या

Crime News | उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये भाजप जिल्हा मंत्री प्रमोद यादव यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. भाजप नेत्याच्या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांना निमंत्रण पत्रिका देण्याच्या बहाण्याने अज्ञात दुचाकीस्वारांनी अडवले आणि गोळ्या झाडून (Crime News) हा गुन्हा केला. या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. हल्ल्यानंतर भाजप नेते प्रमोद यादव कुमार यांना जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. मारेकऱ्यांना पकडण्यासाठी एसपींनी अनेक पोलिस पथके तयार केली आहेत.

ही घटना गुरुवारी सकाळी घडली. प्रमोद यादव कुमार असे मृत भाजप नेत्याचे नाव आहे. सपाने दिलेल्या माहितीनुसार, भाजप नेते प्रमोद यादव गुरुवारी आपल्या कारमधून काही कामासाठी जात होते. यावेळी हे आरोपी दुचाकीवर आले आणि त्यांनी त्यांचा रस्ता अडवला. निमंत्रण पत्रिका देण्याच्या बहाण्याने दुचाकीवर बसलेल्या तरुणांनी भाजप नेत्याची गाडी अडवली होती.

गाडी थांबताच हल्लेखोरांनी प्रमोद यादव यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी गोळ्या लागल्याने भाजप नेते जखमी झाले. आरोपी तरुणही लगेच तेथून पळून गेला. जखमी अवस्थेत प्रमोद यादव यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं