Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं

Loksabha Election 2024 | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव येथे सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला. उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, ज्यांच्याबरोबर ते बसले आहेत, त्यांनी कलम 370, सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर, छत्रपती संभाजीनगर नामकरणाला विरोध केला. मग तुम्ही त्यांच्याबरोबर कसं राहू शकता. असं वक्तव्य अमित शाह यांनी केले. याला खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.

संजय राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि अमित शाह महाराष्ट्रात येऊन जनतेचं मनोरंजन करतात. आम्ही भाजपबरोबर नव्हतो, तरीही कलम 370 हटवल्यानंतर शिवसेनेनं पाठिंबा दिला होता. शाहांनी आपली स्मरणशक्ती व्यवस्थित करून घेतली पाहिजे. कलम 370 हटवून काश्मीरमध्ये काय दिवे लावलेत ते सांगा? काश्मीरी पंडित माघारी आले का? हजारो काश्मीरी पंडित निर्वासितांचं जीवन जगत आहेत. त्यांचा आक्रोश तुमच्या कानापर्यंत येत नाही. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. काश्मीरचं नाव घेण्याची तुमची लायकी नाही.”

“सर्जिकल स्ट्राईकबाबत भाजप जनतेशी खोटं बोलली आहे. अशा प्रकारचा सर्जिकल स्ट्राईक झाला का? याबद्दल आताही शंका उपस्थित होत आहे. काश्मीरची जनता आणि तरूण बेरोजगार आहेत. अखंड भारत करू, पाकव्याप्त काश्मीर भारतात आणू ही 2014 आणि 2019 मध्ये भाजपची घोषणा होती. काय केलं तुम्ही? याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे. 2019 मध्ये पुलवामा घडलं किंवा निवडणुका (Loksabha Election 2024) जिंकण्यासाठी घडवलं गेलं. मते मागण्यासाठी शहीदांचा बाजार मांडला. याची तुम्हाला लाज वाटली पाहिजे,” असा हल्लाबोल राऊतांनी अमित शाहांवर केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान