Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Amit Shah : लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केले जाईल. काँग्रेसच्या पक्षाच्या संभाव्य जागांवरील स्थानिक पदाधिकारी यांचे मते व राजकीय परिस्थिती याची चर्चा करण्यात आली. मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली.

प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे लोकसभा निवडणुकीसंदर्भात मुंबई वगळता राज्यातील २० मतदारसंघाबाबत चर्चा प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या बैठकीला विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, गोवा, दिव, दमनचे प्रभारी माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे गटनेते सतेज बंटी पाटील, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष प्रा. वर्षा गायकवाड, खासदार चंद्रकांत हांडोरे, माजी मंत्री आ. यशोमती ठाकूर, आ. अमित देशमुख, आ. विश्वजीत कदम, कार्याध्यक्ष नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे सर्व जिल्हाध्यक्ष, माजी खासदार, आमदार, जिल्हा प्रभारी, सर्व विभागप्रमुख, जिल्ह्यातील आघाडी व संघटनांचे प्रमुख आदी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही.
दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी घराणेशाहीवर टीका केल्याच्या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, अमित शाह यांचा मुलगा कोणते क्रिकेट खेळला की बीसीसीआयचा सचिव केला आहे. दुसऱ्याकडे एक बोट केले की चार बोटे आपल्याकडे असतात हे लक्षात ठेवावे. अमित शाह यांना घराणेशाहीवर बोलण्याचा काहीही अधिकार नाही.

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान