उद्धव ठाकरे हे जितेंद्र आव्हाडांना बाप वाटत असावेत ; चंद्रकांतदादांचा घणाघात

मुंबई : हिवाळी अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून सत्तधारी आणि विरोधक हे विविध मुद्यांवरून आमने-सामने येत आहेत. यातच आता अधिवेशनातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad)आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यात चांगलाच वाद रंगल्याचे दिसून येत आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा बाप काढला होता. आव्हाडांच्या या विधानावर चंद्रकांत पाटलांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. बाप काढणं ही आव्हाडांची संस्कृती आहे. माझा बाप काढून आव्हाडांना काय मिळणार? असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

विधान भवन परिसरात मीडियाशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले, ‘आव्हाडांनी माझा बाप काढला. ही त्यांची संस्कृती आहे. पण आव्हाडांना उद्धव ठाकरे हे त्यांचा बाप वाटत असावा ; ठाकरेंशी जवळीक करून त्यांना फाईल क्लेअर करून घ्यायची असेन,” अशा शब्दांत प्रत्युत्तर देत, पाटील यांनी आव्हाडांवर घणाघातच केला.

उद्धवजींच्या तब्येतीबाबत त्यांनी मला समजून सांगण्याची गरज नाही. मला खूप कल्चर आहे. संघाने आणि माझ्या आईबापाने मला संस्कार दिले आहेत. उद्धवजींची तब्येत बरी होण्यासाठी मला प्रदर्शन करण्याची गरज नाही. मी रोज प्रार्थना करत असतो या माणसाच्या आयुष्यात काय आहे. त्यांना आराम मिळावा ही सर्व देवतांना प्रार्थना करत असतो. ते मुख्यमंत्री आहेत. आजारी असताना त्यांनी विधानसभेत येण्याचा हट्ट धरू नये. त्यांनी दुसऱ्यांना जबाबदारी द्यावी, असंही ते म्हणाले.