CWG 2022 : 8 व्या दिवशी भारताय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी, तीन सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्यपदक जिंकली

CWG 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022) च्या आठव्या दिवशी, भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. शुक्रवारी भारताच्या खेळाडूंनी 6 पदके जिंकली. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या आठव्या दिवशी, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, अंशू मलिक, मोहित ग्रेवाल आणि दिव्या काकरन (Bajrang Punia, Sakshi Malik, Deepak Punia, Anshu Malik, Mohit Grewal and Divya Kakaran) यांनी भारताच्या झोळीत पदके टाकली.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारत सध्या पाचव्या क्रमांकावर आहे  (India is currently ranked fifth in the CWG 2022 ). भारताने आतापर्यंत 9 सुवर्ण, 8 रौप्य आणि 9 कांस्य पदके जिंकली आहेत. ऑस्ट्रेलिया अव्वल, भारताचाही टॉप-५ मध्ये समावेशत्याच वेळी, कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या पदकतालिकेत ऑस्ट्रेलिया अव्वल स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत 138 पदके जिंकली आहेत. ज्यामध्ये 50 सुवर्ण पदकांसह 43 रौप्य पदक आणि 45 कांस्य पदकांचा समावेश आहे. याशिवाय इंग्लंड १२९ पदकांसह दुसऱ्या तर कॅनडा ६७ पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंड 41 पदकांसह चौथ्या क्रमांकावर आहे. अशा प्रकारे, ऑस्ट्रेलिया व्यतिरिक्त, इंग्लंड, कॅनडा, न्यूझीलंड आणि भारत हे टॉप-5 देशांमध्ये समाविष्ट आहेत.

राष्ट्रकुल क्रीडा 2022 मध्ये भारतासाठी सुवर्णपदक विजेते – मीराबाई चानू, जेरेमी लालरिन्नुंगा, अंचिता शेउली, महिला लॉन बॉल संघ, टेबल टेनिस पुरुष संघ, सुधीर (पॉवर लिफ्टिंग), बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया

रौप्य पदक विजेते – सारंगी संकेत , बिंदियारानी देवी, सुशीला देवी, विकास ठाकूर, भारतीय बॅडमिंटन संघ, तुलिका मान, मुरली श्रीशंकर, अंशु मलिक

कांस्यपदक जिंकणारे खेळाडू –  गुरुराजा पुजारी, विजय कुमार यादव, हरजिंदर कौर, लवप्रीत सिंग, सौरव घोषाल, गुरदीप सिंग, तेजस्वीन शंकर, दिव्या काकरन, मोहित ग्रेवाल