दलित मुस्लिमांची एकजूट रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सन्मानाची भागीदारी मिळवून देईल – Ramdas Athawale

Ramdas Athawale – रिपब्लिकन पक्ष (Republican Party) दलितांमधील विविध गटांना एकत्र करीत आहे. दलितांच्या एकजुटीला मुस्लिमांच्या एकजुटीने साथ दिली पाहिजे. देशभरात दलित मुस्लिमांची एकजूट आपण उभारत आहोत.दलित मुस्लिमांच्या एकजुटीचे मतदान रिपब्लिकन उमेदवारांना मिळत राहिल्यास रिपब्लिकन पक्षाला लोकमान्यते बरोबर राजकीय मान्यता मिळेल. रिपब्लिकन पक्षाला सत्तेत सन्मानाची भागीदारी मिळेल. त्यामुळे देशभरात दलित मुस्लिमांसोबत सर्व बहुजन समाजाची एकजूट रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याखाली करण्यासाठी कामाला लागा असे आवाहन आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायालयाचे मंत्री रामदास आठवले यांनी केले.

जोगेश्वरी पश्चिम येथील किल्लेदार ग्राउंडवर रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रिपाइंचे मुंबई उपाध्यक्ष सोहेल शेख यांच्या नेतृत्वात दलित मुस्लिम एकता परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात उद्घाटक म्हणून नामदार रामदास आठवले यांनी प्रमुख मार्गदर्शन केले . यावेळी स्थानिक खासदार गजानन कीर्तिकर ; रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर; राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे; रिपाइं चे मुंबई अध्यक्ष सिद्धार्थ कासारे ; भाजपचे प्रवक्ते आसिफ भामला; रिपाइं जिल्हा अध्यक्ष प्रकाश जाधव; आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) रिपब्लिकन पक्षाला महाराष्ट्रात दोन जागा मिळाल्या पाहिजेत. शिर्डी या लोकसभा मतदारसंघात मी स्वतः निवडणूक लढणार आहे. भाजपने जर मला लोकसभेची जागा सोडली तर मी कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नाही तर मी माझ्या रिपब्लिकन पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढेल .यापूर्वी मी पंढरपुरातून खटारा या निवडणूक चिन्हावर निवडून आलो आहे .त्यापूर्वी मी मुंबईतून रिपब्लिकन पक्षाच्या उगवता सूर्य चिन्हावर निवडून आलो होतो. रिपब्लिकन पक्षाचे अस्तित्व स्वतंत्र आहे.रिपब्लिकन पक्षाला राजकीय मान्यता प्राप्त पक्ष करण्यासाठी रिपाइंच्या स्वतंत्र चिन्हावर आम्हाला निवडणूक लढणे गरजेचे आहे .मी राज्यसभा खासदार पदी रिपब्लिकन पक्षाच्या एबी फॉर्मवर निवडून आलेलो आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक विधानसभेची निवडणूक रिपब्लिकन पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढेल. रिपब्लिकन पक्षाला मान्यता प्राप्त पक्ष करण्यासाठी स्वतःचे स्वतंत्र निवडणूकचिन्ह प्राप्त करण्यासाठी दलित मुस्लिम आदिवासी बहुजन सर्वांची एकजूट रिपब्लिकन पक्षाच्या झेंड्याखाली करणे आवश्यक आहे त्यासाठी कार्यकर्त्यांनी लोकांना आपल्या पक्षात जोडण्यासाठी कामाला लागावे असे आवाहन नामदार रामदास आठवले यांनी केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर काँग्रेस आणि विरोधी पक्ष खोडसाळ आरोप करतात.मात्र प्रधानमंत्री मोदी हे दलित आणि मुस्लिमांच्या विरोधात नाहीत .ते संविधानाच्या विरोधात नाहीत. काँग्रेसच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका. नरेंद्र मोदी हे संविधानाचे समर्थक आहेत. महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे मजबूत संविधान आहे. संविधानाला कोणी हात लावू शकत नाही .कुणाच्या बापाच्या बापालाही संविधानाला हात लावण्याची हिम्मत होणार नाही. जर संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर देशात आग लागेल असा इशारा नामदार रामदास आठवले यांनी यावेळी दिला.केंद्र सरकार च्या विविध योजना या दलित मुस्लिम आणि सर्व समाज घटकांना लाभ देणाऱ्या योजना आहेत याबगतची माहिती ना. रामदास आठवले यांनी यावेळी दिली. दलित मुस्लिम एकता परिषदेत रिपब्लिकन पक्षाने प्रचंड शक्ती प्रदर्शन घडवले यावेळी हजारो दलित मुस्लिम नागरिक मोठ्या संख्येने एकजुटीने उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर