Kranti Redkar | समीर वानखेडेची पत्नी क्रांती रेडकरला पाकिस्तानातून जीवे मारण्याची धमकी

Kranti Redkar Received Threat: मुंबई एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिला शुक्रवारी जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. माहिती देताना मुंबई पोलिसांनी सांगितले की, रेडकरला पाकिस्तानी नंबरवरूनही अश्लील मेसेज येत आहेत. क्रांती रेडकर हिने गोरेगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आले होते.

समीरवर 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप
समीरवर 25 कोटींची लाच घेतल्याचा आरोप आहे. आर्यन खानला (Aryan Khan) क्रूझ शिप ड्रग बस्ट प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी 25 कोटी रुपयांची लाच मागितल्याचाही आरोप आहे.

महत्वाच्या बातम्या-

Congress | कॉंग्रेसला सर्वात मोठा धक्का; माजी मुख्यमंत्र्याच्या कन्येने केला भाजपमध्ये प्रवेश

Congress | ‘महंगाई डायन’ म्हणणाऱ्या भाजपाला आता तीच ‘महंगाई डार्लिंग’ वाटू लागली आहे का? काँग्रेसचा सवाल

तुम्हाला सन्मानाचं पद देऊ,ठाकरेंनी नितीन गडकरींना ऑफर दिल्यानंतर आता सुधीर मुनगंटीवारांची ठाकरेंना ऑफर