‘सबसे कातील’ गौतमीने घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट, ‘हे’ खास गिफ्टही दिलं

सातारा- आपल्या नृत्यामुळे चर्चेत असलेली नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. गौतमीच्या कार्यक्रमांची नेहमीच लोकांमध्ये चर्चा असते. अशातच आता गौतमीने खासदार उदयनराजे भोसले यांची साताऱ्यातील निवासस्थानी भेट घेतली असल्याचे समजत आहे. गौतमीने खासदार उदयनराजे (Udayanraje Bhosale) यांच्या भेटीत राजेंना भेटवस्तू देखील दिल्याची माहिती समोर आलीय. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

“छत्रपती उदयनराजे यांची भेट घेतल्यानंतर खूप छान वाटलं. महाराजांची आज भेट होईल, असं मला सकाळी खरं वाटलं नव्हतं. पण अखेर खरंच भेट झाली. महाराजांचा स्वभाव खूप छान आहे. त्यांना भेटून खूप छान वाटलं. त्यांना कलाकारांची खूप जाण आहे, म्हणून मला अभिमान वाटतो”, असं गौतमी पाटील म्हणाली.