Rohit Pawar – फडणवीसांवर बोलल्यावर एसआयटी लागते, पेपर फुटी करणाऱ्यांवर कारवाई का नाही?

Rohit Pawar : कर्जत जामखेड मतदार संघामधील एमआयडीसीचा मुद्दा मी अधिवेशनात मांडल्यानंतर आमचे विरोधक राम शिंदे जे झोपलेले असतात ते जागे होतात. उद्योग मंत्री यांच्यावर वरून फोन करून बैठक घेण्यासाठी सांगायला सांगतात केवळ बैठकी घेऊन राजकारण करण्याचं काम सध्याचे सरकार करत असल्याचा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी विधान भवन मध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना केला आहे.

रोहित पवार म्हणाले की, अधिवेशनात मी माझ्या मतदारसंघातील एमआयडीसीचा मुद्दा मांडला आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी बैठक आयोजीत करण्यात आली आहे. असं सतत होतांना पाहायला मिळत आहे. यांना फक्त राजकारण करायचं आहे त्यामुळं आम्हाला बैठकीला बोलवलं नाहीं असे रोहित पवार म्हणाले.

रोहित पवार म्हणाले की, दोन दिवसांपूर्वी भाजप नेत्यांची एक बैठक पार पडली, त्या बैठकीत देवेंद्र फडणवीस प्रचंड रागावले होते. त्यामुळं काल फक्त देवेंद्र फडणवीस यांना खुश करण्यासाठीं भाजपचे नेते मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले होते. या माध्यमातुन टार्गेट दुसऱ्याच कुणाला तरी करण्यात येत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलल्यावर एसआयटी चौकशी केली जाते. मात्र, पेपरफुटी ज्यानी केली त्यांच्यावर कारवाई होतं नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांचा यामागे हात आहे असेही रोहित पवार म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

रोहित पवार म्हणाले की, राजकिय षडयंत्र भाजपसोडून दुसरं कोणी करत नाही. नेत्याच्या विरोधात बोललं की एसआयटी लागते. पूर्ण देशात किंवा महाराष्ट्रात भाजपला सत्ता येईल असं वाटतं नाहीं. त्यामुळं त्यांचे सातत्यानं दौरे वाढले आहेत. आरक्षणाचा मुद्दा, धनगर आरक्षण मुद्दा संसदेत सुटू शकतो. माञ तिथं कूणी विषय काढत नाही. सध्या लोकं त्यांच्या बाजूने नसल्यामुळे भाजप चिंतेत आहे असे रोहित पवार म्हटले.

पुढे रोहित पवार म्हणाले की, १ लाख २० हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ गुजरातमध्ये सापडले आहेत. महिन्याच्या अंतरात २ हजार कोटी रुपयांचे अमली पदार्थ सापडत असतील तर हे गंभीर आहे, असल्याचे रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार म्हणाले की, चारच्या आसपास जागा अजित पवार यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामधे शिरूर लोकसभा मतदारसंघ नसेल, कारण तो शिवसेनेला जाणार आहे. अजित पवार हे दिलीप वळसे पाटील यांना लोकसभा निवडणूक लढण्यासाठी मागणी करत होते. मात्र, दिलीप वळसे पाटील कुणाचंच ऐकत नाहीत. शरद पवार साहेब याचं देखील त्यांनी ऐकलं नाही, असे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी