Daniel Balaji | दाक्षिणात्य अभिनेता डॅनियल बालाजी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, वयाच्या 48 व्या वर्षी घेतला शेवटचा श्वास

Daniel Balaji Passes Away | दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक वाईट बातमी येत आहे. तामिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू पसरवणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेता डॅनियल बालाजी आज आपल्यात नाहीत. शुक्रवारी (29 मार्च) वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्याचा मृत्यू झाला.

हृदयविकाराच्या झटक्याने डॅनियल बालाजीचे निधन
डॅनियल बालाजी (Daniel Balaji ) म्हणून ओळखल्या जाणार्‍या टीसी बालाजी यांच्या अचानक निधनामुळे केवळ चाहतेच नव्हे तर दाक्षिणात्य सिनेसृष्टीलाही धक्का बसला आहे. शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने अभिनेत्याचा मृत्यू झाला. वास्तविक, आदल्या दिवशी, त्याला अचानक छातीत दुखू लागले होते. त्यानंतर त्याला चेन्नईच्या कोटीवाकम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु अभिनेत्याने उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला.

शनिवारी, डॅनियल बालाजींचा मृतदेह पुरुसाईवॉकम येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यसंस्कारासाठी आणला जाईल. डॅनियलच्या मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. लोक सोशल मीडियावर त्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल