Narhari Zirwal | दिंडोरी लोकसभेत मोठा ट्विस्ट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नरहरी झिरवाळांचे चिरंजीव शरद पवार गटातून निवडणूक लढवणार?

Narhari Zirwal Son Gokul Zirwal | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी (Dindori Lok Sabha Constituency) पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉ. भारती पवार (Dr Bharti Pawar) यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) अजूनपर्यंत दिंडोरीसाठी उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. या पार्श्वभूमीवर विधासभा उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांचे सुपुत्र गोकुळ झिरवाळ (Gokul Zirwal) हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची माहिती मिळत आहे.

भाजपाच्या भारती पवार यांना काट्याची टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार भेटलेला नाही. अशातच गोकुळ झिरवाळ यांनी शरद पवार गटाची भेट घेतली आहे. यावेळी निवडणूक लढविण्यासंदर्भातील निवेदन त्यांनी सादर केले आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल