बालेवाडीत ३ आणि ४ फेब्रुवारीला दिवसीय “बालेवाडी शॉपिंग फेस्टिवल”चे आयोजन

 Balewadi Shopping Festival : बाणेर आणि बालेवाडी परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरजा लक्षात घेऊन बालेवाडीत येत्या ३ आणि ४ फेब्रुवारी दरम्यान दोन दिवसीय “बालेवाडी शॉपिंग फेस्टिवल”चे (Balewadi Shopping Festival) आयोजन करण्यात आलय. या ठिकणी एकाच छताखाली सर्वाना आवडणाऱ्या आणि परवडणाऱ्या वस्तू खरेदी करता येणार आहेत. हा फेस्टिव्हल बालेवाडी येथील, दसरा चौकातील, आठवडे बाजार ग्राउंडवर दुपारी साडेबारा ते रात्री साडेनऊ पर्यंत सर्वांसाठी खुला असणार आहे. बाणेर-बालेवाडीकरांना मनसोक्त खरेदी आणि लज्जतदार पदार्थांची मेजवानी एकाच छताखाली दोन दिवस मिळणार आहे.

या “समर शॉपिंग फेस्टिवल” मध्ये प्रामुख्याने बनारसी साड्या, चंदेरी साड्या, कांजीवरम, पैठणी, शोभेच्या वस्तू, ज्वेलरी, पंजाबी सूट्स, प्लाझो, फाब्रिक डिझाईनर साड्या, रेडी टू वेअर ब्लाऊज, कॉटन मेन्स शर्ट्स आणि किड्स वेअर, सुगंधी हॅन्डमेड सोप, ब्युटी प्रॉडक्ट्स, खान्देशी केळीचे वेफर्स, शेंगदाणा गुळपट्टी, शोभेच्या वस्तू, सोलापुरी चादर, महिला बचत गटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, लोणच्यांचे विविध प्रकार, दर्जेदार गावरान आणि घरगूती मसाले, पापड कुर्डाई, शोभेच्या वस्तू, रेडी टू कुक फूड्स, मातीची भांडी, बेडशीट असे स्टॉल असणार आहेत. या परिसरातील लोक मोठ्या संख्येने या शॉपिंग अँड फूड फेस्टिवलला भेट देत असतात. या मध्ये स्टॉल हवा असल्यास ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा. या माध्यमातून नक्कीच आपल्या व्यवसायाला बाणेर-बालेवाडी (Balewadi Shopping Festival) परिसरातून चालना मिळेल.

उद्योजकांसाठी आणि व्यावसायिकांसाठी बिजनेस प्रोमोट करण्याची सुवर्णसंधी
हिंजवडी आय. टी. पार्क जवळील बाणेर बालेवाडी परिसर आय. टी. रेसिडेन्स हब म्हणून झपाट्याने विकसित झाला आहे. या परिसरातील लोकांच्या रोजच्या जीवनातील गरज लक्षात घेऊन बाणेर-बालेवाडीकारणांसाठी खास “समर शॉपिंग फेस्टिवल”चे आयोजन करण्यात आले आहे. या फेस्टिवलच्या माध्यमातून व्यावसायिकांसाठी बाणेर-बालेवाडी परिसरात बिझिनेझ प्रोमोट करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपणही आपला बिझनेस या लोकांपर्यंत या फेस्टिवलच्या माध्यमातून पोहचवू शकता. तसेच या पुढेही ऑनलाईन सेवा देऊ शकता तरी या फेस्टिवल (Balewadi Shopping Festival) मध्ये सहभागी होण्यासाठी ९८५०३०४१६६ या नंबर वर संपर्क करावा.

लहान मुलांसाठी खास आकर्षण
या फेस्टिव्हल मध्ये लहान मुलांसाठी खास आकर्षण असणारे लांब पायाचे स्टिल्ट वॉकर, आणि जोकर यांची लहान मुलांच्या करमणुकीसाठी तसेच जम्पिंग आणि किड्स बॉऊन्सिंग टोटली फ्री असणार आहे. त्याच बरोबर थोरामोठांसाठी “ये शाम मस्तानी” हा सदाबहार गाण्यांचा प्रोग्रॅमही असणार आहे.

महत्वाच्या बातम्या

गंगावेस तालीम देशातील दर्जेदार तालीम बनवणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

ओबीसी समाजामध्ये सध्या भीतीचे वातावरण, ओबीसींच्या मुलांच्या तोंडचा घास हिरावला जातोय – छगन भुजबळ