Yashomati Thakur | नौटंकीबाजांना घरचा रस्ता दाखवा, आ. यशोमती ठाकूर यांचे जनतेला आवाहन

Yashomati Thakur | नौटंकीबाज लोकांना आता घरी बसविण्याची वेळ आली आहे. सच्चा आणि प्रामाणिक मातीशी जुळलेला उमेदवार मिळाल्याने अमरावती (Amravati) जिल्ह्यातील नागरिकांमध्ये कमालीचा उत्साह असून हा उत्साह मतदानरुपी आशीर्वादात बदलवून बळवंत वानखडे यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन माजी मंत्री आमदार यशोमती ठाकूर यांनी केले.

महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) बोलत होत्या. बळवंत वानखडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडी व घटक पक्षाचे हजारो कार्यकर्ते व पदाधिकारी व अफाट जनसमुदाय नेहरू मैदानावर उपस्थित झाला होता.

महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी खा. अनंत गुढे, बबलू देशमुख, प्रदीप राऊत उपस्थित होते. सकाळी शहरातील महापुरुषांना अभिवादन करून संपूर्ण शहरातून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. बळवंत वानखडे यांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅली मुळे अमरावती शहरात उत्साह संचारला होता. त्यानंतर झालेल्या सभेला उपस्थित असलेल्या अफाट गर्दीने विरोधकांचे धाबे दणाणले.यावेळी विविध पक्षाच्या वरिष्ठ तसेच स्थानिक नेत्यांनी मनोगत व्यक्त करून विरोधकांना धारेवर धरले. सभेचे संचालन हरिभाऊ मोहोड व प्रवीण मनोहर यांनी केले.

सभेला काँग्रेसच्या नेत्या आ.यशोमती ठाकूर, शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनिल देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, काँग्रेसचे प्रवक्ते ऍड. दिलीप एडतकर, आ. धीरज लिंगाडे, माजी महापौर डॉ. मिलिंद चिमोटे, भैय्या पवार, हरिभाऊ मोहोड, प्रवीण मनोहर, किशोर बोरकर, विलास इंगोले, बबलू शेखावत, कम्युनिस्ट पार्टचे तुकाराम भस्मे, नितीन कदम, रामेश्वर अभ्यंकर, वीरेंद्र जगताप, बबलू देशमुख, अनिसचे ऍड गणेश हलकारे,शिवसेना जिल्हाध्यक्ष सुनील खराटे, प्रीती बंड, धाने पाटील, नाना नागमोते, महानगर प्रमुख पराग गुडधे, श्याम देशमुख,सुधीर सूर्यवंशी, बाळासाहेब भागवत, महेंद्र दिपटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत, शहराध्यक्ष प्रा. हेमंत देशमुख, महिला शहर अध्यक्ष वर्षा भटकर, संगीता ठाकरे,विनेश आडतीया,रमेश बंग, गणेश रॉय, आसिफ तवक्कल, मुक्कद्दर खा पठाण, नसीमभाई, प्रा. सुजाता झाडे, कांचनमाला गावंडे, जयश्री वानखडे, संजय वाघ, मनोज भेले, हरिश मोरे, सुधाकरराव भरसाकले, जयंत देशमुख आदी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल