झुंजार नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी, आरोपी अटकेत

Pune – राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांना जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. त्यांच्या कार्यालयातील एका कार्यकर्त्यांच्या मोबाईलवर फोन करुन ही धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी महाडमधून एकाला ताब्यात घेतले आहे.

धमकी देणाऱ्या व्यक्तीने आपले नाव प्रशांत पाटील असल्याचे सांगितले. त्यानंतर याच फोनच्या आधारे पुणे पोलिसांनी प्रशांत पाटीलला महाडमधून ताब्यात घेतले आहे. धमकी देण्यासारखा प्रकार पवार साहेब करणार नाहीत, ते वैचारिक लढाई लढतात; असं म्हणत खुद्द छगन भुजबळ यांनी आरोपीचे पवार कुटुंबाशी कनेक्शन नाकारले.