बंडखोरांची आता खैर नाही! शिवसैनिकांचा संयम सुटला; पुण्यात तानाजी सावंतांचे कार्यालय फोडले

पुणे – महाराष्ट्रातील सध्या सुरू असलेल्या राजकीय संकटाचा रंग बदलू लागला आहे. धमकीनंतर प्रकरण आता हिंसेकडे वळत आहे. शनिवारी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.  त्याचवेळी या हिंसाचारानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी आमदारांच्या बंडानंतर लोकांमध्ये रोष आहे आणि तो रोखू शकत नाही, असे म्हटले आहे.

तानाजी सावंत हे परंडा विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे आमदार आहेत. तानाजी सावंत सध्या गुवाहाटीला शिंदेंसोबत गेल्याच्या रागातून हे भ्याड कृत्य केले. यावेळी आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यालयाची तोडफोड करून गोंधळ घातला. ‘जय शिवाजी’च्या घोषणा देत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आमदार तानाजी यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड सुरू केली.