निर्भीड पत्रकाराला धक्काबुक्की करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी

Attack on Dnyaneshwar Choutmal | पुण्यातील गोखलेनगर येथे आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेले पत्रकार ज्ञानेश्वर चौतमल आणि कॅमेरामन निखिल करंदीकर यांना पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांनी धक्काबुक्की करुन त्यांचा कॅमेरा व मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रकार शुक्रवारी घडला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आता मुजोर पोलिसांची अडचण वाढणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. अनेक पत्रकार संघटना या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे सध्या चित्र पाहायला मिळत आहे. एका निर्भीड पत्रकाराला अशाप्रकारे धक्काबुक्की करणाऱ्या मुजोर पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. याच साठी या घटनेला जबाबदार पोलिस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी अशी पुणे श्रमिक पत्रकार संघाची आग्रही मागणी आहे. या मागणीसाठी पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची पुण्यातील पत्रकारांनी भेट घेतली.

पत्रकारांना धक्काबुक्की करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सरचिटणीस सुकृत मोकाशी यांच्यासह पत्रकारांच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त रितेश कुमार यांना केली आहे. विशेष म्हणजे पत्रकारांना वार्तांकन करताना पोलिसांनी धक्काबुक्की केल्याच्या या प्रकाराची प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने (पीसीआय) देखील गंभीर दखल घेतली आहे. पीसीआयचे सदस्य पराग करंदीकर यांनी पुणे पोलिस आयुक्तांना पत्र लिहून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर: रमेश चेन्नीथला

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी