धंगेकरांच्या डोक्यात गेली आमदारकीची हवा? पालिका कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल 

Pune News : पुण्यातील गोखलेनगर येथील एका पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यावरून मोठा वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.  काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी शिवाजीनगर विधानसभेचे विद्यमान आमदारासह संपूर्ण भाजपालाच आव्हान दिले. मात्र त्या उद्घाटनप्रसंगी धंगेकर यांचे वर्तन पाहून धंगेकरांच्या डोक्यात हवा गेली  आहे का ? असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.

या टाकीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते होण्यापूर्वी धांगेकर यांनी नारळ फोडण्याचा प्रयत्न केला.त्यावेळी धांगेकरांनी काँग्रेसच्या नेते आणि कार्यकर्त्यांसह शक्ती प्रदर्शन करत  स्टंट करण्याचा प्रयत्न केला.  काँग्रेसच्या आंदोलना दरम्यान धंगेकर यांनी महापालिकेच्या एका अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचे देखील समोर आले आहे.

यानंतर आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांनी एक्स या प्लॅटफॉर्मवर हा व्हिडिओ शेअर करत सुसंस्कृत कसब्याचे काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर महापालिका अधिकाऱ्यांना शिव्या देत आहेत असे म्हटले आहे. ही मस्ती आली कुठून? असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

तसेच यांचे नेते दिवसरात्र ‘मोहब्बत की दुकान’ म्हणून तोंडच्या वाफा टाकता पण या ‘मोहब्बत की दुकान’चा हाच खरा चेहरा आहे, जो धंगेकरांनी सर्वांसमोर दाखवला. असा हल्लाबोल मोहळ यांनी धंगेकरांवर  केलाय.  अवघ्या वर्षभराच्या आतच आमदारकीची हवा धंगेकरांच्या डोक्यात गेली. पण हा मस्तवालपणा पुणेकर लवकरच उतरवतील असं देखील मोहळ यांनी या ट्विट मध्ये म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर: रमेश चेन्नीथला

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी