आमदार लक्ष्मण जगतापांनी देवेंद्र फडणवीसांना ‘सीएम साहेब’ म्हणून हाक मारली !

मुंबई – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार (Sanjay Raut and Sanjay Pawar), राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी (Praful Patel from NCP and Imam Pratapgadhi from Congress) तर भारतीय जनता पार्टीने (BJP) पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक (Piyush Goyal, Anil Bonde and Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाकडे 106 आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपाला तिसऱ्या आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष तसंच अन्य पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (Marxist Communist Party) आणि समाजवादी पक्षानं (Socialist Party) महाविकास आघाडीला (MVA) पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. यातच आता एमआयएमने (MIM) महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करणार असल्याचं जाहीर केल्याने महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला आहे. या मतांमुळे आमचा विजय निश्चित झाला असल्याचे महाविकास आघाडीचे नेते सांगत आहेत.

गेली काही दिवस जीवघेण्या आजाराशी सामना करून नुकतेच घरी परतलेले चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप (Mla Laxman Jagtap) हे राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya sabha Election) मतदानासाठी कार्डियाक रुग्णवाहिकेतून (cardiac ambulance) विधान भवनात पोहोचले. यावेळी त्यांना घेण्यासाठी खुद्द राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खाली आले होते. त्यावेळी त्यांनी फडणवीस यांना सीएम साहेब, सीएम साहेब अशी हाक मारली. दरम्यान, आमदार लक्ष्मण जगताप यांनी पीपीई कीट घालूनच आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.