देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, शरद पवार यांचा हल्लाबोल

Sharad Pawar  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार व प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज प्रदेश कार्यालय, मुंबई येथे चिपळूण विधानसभा मतदारसंघातील सहकार क्षेत्रातील प्रशांत यादव व भारतीय जनता पक्षाचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग पाष्टे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला आहे. यांच्यासह त्यांच्या समर्थनातील अनेक कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.

पक्षप्रवेशावेळी मार्गदर्शन करताना राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, देशात सध्या सत्तेत असलेल्या पक्षाकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षातील नेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. केंद्रातील यंत्रणेच्या माध्यमातून पक्ष फोडाफोडीचे काम देखील करण्यात येत आहे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. मात्र सत्तेचा गैरवापर करून शिवसेना सत्तेत असलेल्या सोबत आलेल्या व्यक्तींकडे देण्यात आली आहे तसंच काहीसं आपल्या सोबत देखील झाले आहे.

शरद पवार म्हणाले की, केंद्रात सत्तेत असलेल्या सत्ताधारी पक्षाच्या वतीने केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून विरोधी पक्षाने स्थापन केलेल्या इंडिया आघाडीतील पक्षातील नेत्यांविरोधात विविध तपास यंत्रणेच्या माध्यमातून चौकशी केली आहे. आपल्या विरोधात दुसरा पर्याय उभा राहू नये याकरिता सत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे असे शरद पवार म्हणाले.

पवार म्हणाले की, आगामी काळात लोकसभा आणि त्या नंतर ४ महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहे. यामध्ये महत्त्वाचे आहे की पक्ष मजबूत केला पाहिजे संघटना मजबूत केली पाहिजे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज पक्ष प्रवेश झाला तरी राज्यात त्यांच्या नेतृत्वात सगळ्यांनी काम केले पाहिजे. जर जोमाने काम केले तर आपण आगामी काळातील, महाराष्ट्राचे चित्र बदलू शकतो असेही शरद पवार म्हणाले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय चिटणीस व प्रवक्ते नसीम सिद्दीकी, माजी मंत्री व आमदार राजेश टोपे, विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे, प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश सरचिटणीस व निरीक्षक बबन कनावजे, प्रदेश सरचिटणीस प्रभाकर चाळके, प्रदेश सरचिटणीस अदितीताई नलावडे, प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे, प्रदेश चिटणीस बशीर मुर्तजा, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, चिपळूणचे माजी आमदार रमेश कदम, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बने, रत्नागिरी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, रत्नागिरी संपर्क प्रमुख प्रशांत पाटील, रत्नागिरी महिला जिल्हा अध्यक्षा दिपीकाताई कोतवडेकर व डॉ. नलिनीताई भुवड यांसह इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

‘वंचित’शी चर्चा करण्याची जबाबदारी नाना पटोले, बाळासाहेब थोरात व अशोक चव्हाण यांच्यावर: रमेश चेन्नीथला

मनोज जरांगे पाटलांचे उपोषण सोडवताना दोन उपमुख्यमंत्री गैरहजर का?

गांजा घेतल्यानंतर मला मजा येते! पहिल्यांदाच व्यसनाबद्दल बोलला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी